sunil narine twitter
Sports

Sunil Narine Hit Wicket: सुनील नरेन हिट विकेट होऊनही Not Out राहिला, नियम काय सांगतो?

Sunil Narine Hit Wicket: आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात सुनील नरेन आऊट झाला होता. मात्र तरीही तो नॉटआऊट राहिला. नेमकं कारण काय?

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणेने ताबडतोड फलंदाजी केली. यादरम्यान सुनील नरेनची बॅट स्टम्पला लागली होती. मात्र तरीदेखील त्याला आऊट दिलं गेलं नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. आरसीबीची गोलंदाजी सुरु असताना ८ वे षटक टाकण्यासाठी रसिख सलाम गोलंदाजीला आला. राऊंड द विकेटचा मारा करत असलेल्या रसिखने वेगवान शॉर्ट चेंडू टाकला. सुनील नरेननेही जोरदार बॅट फिरवली. मात्र त्यावेळी चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही.

अंपायरने चेंडूची उंची पाहून हा चेंडू वाईड असल्याचं सांगितलं. त्यावेळी नरेनची बॅट स्टम्पला लागली आणि बेल्स खाली पडली. सुरुवातीला असं वाटलं की, कोणाचं लक्ष गेलं नसेल. पण त्यानंतर समजलं की, बॅटला जाऊन लागली पण तो आऊट नव्हता

नरेन आऊट का नव्हता? काय सांगतो नियम?

चेंडू टाकल्यानंतर अंपायरने वाईडचा निर्णय दिला होता. त्यानंतर चेंडू डेड झाला. त्यानंतर नरेनची बॅट स्टम्पला जाऊन लागली. त्यामुळे त्याला आऊट दिलं गेलं नाही. एमसीसीचा नियम ३५.११ नुसार, ज्यावेळी फलंदाज शॉट खेळण्याच्या प्रयत्नात असतो, त्यावेळी फलंदाजाची बॅट किंवा शरीराचा कुठलाही भाग स्टम्पला जाऊन लागला, तर फलंदाज हिट विकेट आऊट होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT