sunil gavaskar saam tv
Sports

T-20 World Cup 2024: हे ४ संघ गाठणार टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल; सुनील गावस्करांची मोठी भविष्यावाणी

Sunil Gavaskar T20 World Cup Semi Finalist: आगामी टी-२० वर्ल्डकप सुरु होण्यापुर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेचा फायनलचा सामना २९ जून रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे. नुकताच भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात याबाबत भविष्यवाणी केली आहे.

सुनील गावस्करांच्या मते भारतीय संघासह इंग्लंड, वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. भारतीय संघ हा टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा पहिलाच संघ आहे. २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने विजय मिळवला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी होणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत- पाकिस्तान सामना येत्या ९ जून रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ १२ जून रोजी अमेरिकेसोबत तर १५ जून रोजी कॅनडासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे.

सुनील गावस्कर यांनी इंग्लंडला देखील आपल्या टॉप ४ मध्ये ठेवलं आहे. इंग्लंडने आतापर्यंत २ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. इंग्लंडचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन देखील आहे. २०१० मध्ये या संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत जेतेपदाला गवसणी घातली होती. तर २०२२ मध्ये पाकिस्तानला पराभूत करत या संघाने टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती.

सुनील गावस्करांनी भारत आणि इंग्लंडसह, वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांची टॉप ४ मध्ये निवड केली आहे. वेस्टइंडिजमध्ये आतापर्यंत २०१२ आणि २०१६ मध्ये झालेल्या स्पर्धेत टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. तर ऑस्ट्रेलियाने २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT