ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देवबांध गणपती मंदिर हे जव्हार तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. आजूबाजूला शांत वातावरण आणि हिरवळ पाहून मनाला प्रसन्न वाटते.
हे गणपती मंदिर स्थानिक आदिवासी संस्कृतीशी जोडलेले आहे. हे गणपती मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला लोक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
मुंबईपासून जव्हार सुमारे 140 किमी अंतरावर आहे. तसेच तुम्ही मुंबई वरुन ठाणे किंवा पालघर पर्यंत बसने येऊ शकता. तिथे उतरल्यानंतर बस पकडून तुम्ही जव्हारला पोहचाल.
जव्हार गावातून देवबांध गणपती मंदिर 8 ते 10 किमी अंतरावर आहे. येथे बाईक किंवा ऑटोने सहज जाता येते.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महिने येथे भेट देण्यासाठी योग्य मानले जातात. तेथील हवामान थंड आणि आल्हाददायक असते.
या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे. आजूबाजूला भरगच्च डोंगर, झाडे आणि नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून आहे.
जव्हारमधील जय विलास पॅलेस, दाभोसा धबधबा, हनुमान पॉईंट आणि सनसेट पॉईंट ही ठिकाणे देवबांध भेटीसोबत नक्की पहा.
जव्हारमध्ये हॉटेल्स, बजेट लॉज आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत तेथे जावून तुम्ही स्टे करु शकता. तसेच तेथील स्थानिक वडापाव, जेवण, भाजी आणि भाकरी यांचा आस्वाद घेऊ शकता.