Sunil gavaskar  Saam tv
Sports

IND VS AUS 3rd Test: 'आपण जडेजामुळे हरलो..' सुनील गावसकरांनी जडेजावर फोडलं पराभवाचं खापर

या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS 3rd Test sunil gavaskar: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंवर टीका केली जात आहे.

दरम्यान भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय संघाची नेमकी कुठे चूक झाली याबाबत वक्तव्य केले आहे. (Latest sports updates)

या सामन्यात अनेक टर्निंग पॉईंट्स पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा नवखा गोलंदाज कुन्हेमनने या सामन्यातील पहिल्या डावात ५ गडी बाद करत भारतीय संघाचा कार्यक्रम केला.

तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु असताना भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ११ धावांवर गडी बाद केले होते. मात्र सुनील गावसकरांच्या मते रवींद्र जडेजाने टाकलेला नो बॉल या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून ३१ धावांची खेळी करणारा लाबुशेन हा खाते ही न उघडता माघारी परतला असता. रवींद्र जडेजाने त्याला बाद केले होते . मात्र हा चेंडू नो बॉल होता. त्यामुळेलाबुशेनला जीवदान मिळाले होते.

याबाबत बोलताना सुनील गावसकरांनी म्हटले की,' जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर तुम्हाला जाणवेल की याच कारणामुळे तुम्ही सामना गमावला. कारण त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि लाबशेनने मिळून ९६ धावांची भागीदारी केली. मला वाटतं हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. या कारणामुळे भारतीय संघाला सामना गमवावा लागला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT