sunil gavaskar twitter
Sports

IND vs CAN: भारत- कॅनडा सामना रद्द होताच सुनील गावस्कर भडकले! थेट ICC वर साधला निशाणा

Sunil Gavaskar On IND vs CAN Match: भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना रद्द होताच सुनील गावस्कर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार होता. हा सामना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होणार होता. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मैदानावर ४ सामन्यांचे आयोजन केले गेले होते. मात्र पावसामुळे ३ सामने रद्द केले गेले. सलग तिसरा सामना रद्द केल्यानंतर माजी भारतीय खेळाडू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.

पावसामुळे सामने रद्द झाल्यामुळे काही प्रमुख संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करु शकलेले नाहीत. ज्यात पाकिस्तानचा देखील समावेश आहे. भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द होणार असताना समालोचन करत असलेले सुनील गावस्कर म्हणाले की, 'आयसीसीने अशा मैदानावर सामने ठेवायला नको होतं. जिथे मैदान पूर्णपणे झाकण्याची सुविधा नाही. तुम्ही खेळपट्टी झाकताय आणि पूर्ण मैदान ओलं होतंय.असं तुम्ही करु शकत नाही.'

फ्लोरिडामध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळले जाणार होते. मात्र ३ सामने पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे हे सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच मैदानावर शेवटचा सामना पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. आता हा सामना पावसामुळे होणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या मैदानावर पहिला सामना श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुढील सामने अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि भारत विरुद्ध कॅनडा या दोन्ही संघांमध्ये होणार होते. मात्र या तिन्ही सामन्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. स्पर्धेतील शेवटचा सामना १६ जून रोजी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना तितका महत्वाचा नसणार आहे. कारण दोन्ही संघ सुपर ८ मधून बाहेर पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT