sundar pichai vaibhav suryavanshi ipl debut X
Sports

Sundar Pichai : १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचे सुंदर पिचाई फॅन, एक्स पोस्ट करुन दिल्या शुभेच्छा, "आठवीतल्या पोराला IPL..."

Sundar Pichai Post : सवाई मानसिंग स्टेडियमवर काल राजस्थान विरुद्ध लखनऊ या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. १४ वर्षीय वैभवचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील त्याचे फॅन झाले आहेत.

Yash Shirke

Vaibhav Suryavanshi : राजस्थान रॉयल्सने काल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला खेळायची संधी दिली. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याच्या विक्रमाची नोंद वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाली आहे. फलंदाजी करताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत दमदार एन्ट्री केली. भारतासह जगभरात वैभव सूर्यवंशीचे चाहते झाले आहेत. यात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा देखील समावेश आहे.

सुंदर पिचाई यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले. या पोस्टमध्ये त्यांनी 'आठवीतल्या मुलाला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी उठलो!!!!' असे म्हटले. पोस्टसोबत पिचाई यांनी वैभवचा पहिल्या चेंडूवर षटकार मारतानाचा व्हिडीओ जोडला. आयपीएल लिलावात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर राजस्थान रॉयल्सने बोली लावली आणि त्याला संघात सामील केले. याच सीझनमध्ये त्याला खेळायची संधी देखील दिली.

सवाई मानसिंग स्टेडियमवर काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना खेळला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत आवेश खानने लखनऊला विजय मिळवून दिला. राजस्थानचा पराभव झाला तरीही त्यांच्या एका खेळाडूचे संपूर्ण सामन्यादरम्यान कौतुक झाले. तो खेळाडू म्हणजे १४ वर्षाचा वैभव सूर्यवंशी.

राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्यात यशस्वी जयस्वालसह वैभव सूर्यवंशी सलामीला आला. त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात सामील केले होते. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीने जोरदार षटकार मारला. १७० च्या स्ट्राईक रेटने वैभवने २० चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकार यांचा समावेश होता.

वैभव सूर्यवंशी कोण आहे?

वैभव सूर्यवंशी हा डावखुरा फलंदाज आहे. त्याने अवघ्या १२ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला सुरुवात केली, त्यामुळे तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्वात लहान खेळाडूंपैकी एक आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्ध खेळण्यासाठी त्याची भारतीय अंडर-१९ संघात निवड झाली होती. या सामन्यात त्याने फक्त ५८ चेंडूत शतक मारलं, जे अंडर-१९ भारतीय क्रिकेटमधलं सर्वात वेगवान शतक ठरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT