सातारा: साताऱ्याचा मल्ल आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याचे पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून किरण भगत बाहेर पडला आहे. गोंदियाच्या वेताळ शेळके यानं किरण भगतला पराभूत केले आहे. किरण भगत (Kiran Bhagat) याला 3 गुण तर वेताळ शेळके याला 4 गुण मिळाले. अवघ्या एका गुणाने किरण महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. किरण भगतला पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेनं आसमान दाखवले होते. साम टीव्हीशी बोलतानाही किरण भगत ने यंदाचा महाराष्ट्र केसरी मिच होणार असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु आता त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती (maharashtra kesari kusti) स्पर्धा सातारामध्ये (satara) श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवारपासून सुरु झाली आहे. या स्पर्धेसाठी संकुलातील मुख्य मैदानात मातीचे दाेन माेठे आखाडे तसेच गादी प्रकारासाठी आखाडा तयार करण्यात आला आहे. या स्पर्धेत राज्यातील ४५ संघातील सुमारे ९०० मल्ल विविध वजनी गटात त्यांचे काैशल्य सिद्ध करणार आहेत. मल्लांची वैद्यकीय तपासणी आणि वजन तपासणी पार पडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.