WPL twitter
Sports

New Rule In Cricket: क्रिकेटमध्ये स्टम्पिंग अन् रनआऊटचा नियम बदलणार! WPL मध्ये लागू केला नवा नियम

New Rule In WPL 2025: भारतात महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. दरम्यान या स्पर्धेत स्टम्पिंग अन् रनआऊटचा नियम बदलण्यात आला आहे.

Ankush Dhavre

महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान अंपायरने ३ निर्णय चुकीचे दिले होते. दरम्यान या वादग्रस्त निर्णयानंतर नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर हे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणते आहेत ते नियम? जाणून घ्या.

Espncricinfo नुसार, महिला प्रीमियर लीग स्पर्धा खेळत असलेल्या सर्व संघांना सांगण्यात आलंय की, अंपायर धावबाद तेव्हाच गृहीत धरणार जेव्हा बेल्स स्टम्पपासून पूर्णपणे वेगळी होईल. कारण यापूर्वी चेंडू बेल्सची लाईट पेटताच बाद घोषित केलं जायचं.

महिला प्रीमियर लीग स्पर्धेत एलइडी स्टम्पचा वापर केला जातो. या स्पर्धेतील नियमानुसार, पहिल्या फ्रेममध्ये फक्त स्टम्प आणि बेल्सची एलइडी पेटत असताना दाखवले जातात. तर दुसऱ्या फ्रेममध्ये बेल्स स्टम्पपासून वेगळे होत असल्याचं दाखवलं जातं.

नियम बदलण्यामागचं नेमकं कारण काय?

माध्यमातील वृत्तानुसार, हा नियम एलइडी बेल्समुळेच बदलण्यात आला आहे. कारण जरा संपर्क झाला की, झिंग बेल्सची लाईट पेटते. त्यामुळेच तिसऱ्या अंपायरने नियम बदलण्याच्या आधारावर हा निर्णय दिला होता. दरम्यान सामन्याच्या एक दिवसानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली होती.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना, मुंबई इंडियन्सने १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने ८ गडी बाद १६५ धावा करत २ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT