stuart broad saam tv/Twitter/ECB
Sports

Stuart Broad 600 Wickets: एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स ते कसोटीत 600 विकेट्सचा रेकॉर्ड! पाहा Stuart Broad चा प्रेरणादायी प्रवास

Stuart Broad 600 Wickets In Test : नुकताच त्याने अशी काही कामगिरी करून दाखवली आहे. जे भल्या भल्या गोलंदाजांना करता आलं नाही

Ankush Dhavre

Stuart Broad Record: स्टुअर्ट ब्रॉड, हे नाव जरी ऐकलं तरी युवराज सिंगने मारलेले ते ६ षटकार आठवतात. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच जर कुठल्या गोलंदाजाने ही लाजिरवाणी कामगिरी केली तर नक्कीच त्याचा आत्मविश्वास कमी होईल.

मात्र स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) बाबतीत उलट घडलं आहे. ६ षटकार खाल्ल्यानंतर त्याच्या कामगिरीचा आलेख वर्षानुवर्षे वरच्याच दिशेने जातोय. नुकताच त्याने अशी काही कामगिरी करून दाखवली आहे. जे भल्या भल्या गोलंदाजांना करता आलं नाही. (Stuart Broad 600 Wickets)

अॅशेस मालिकेतील (Ashes 2023) दुसऱ्या चौथ्या कसोटीतील पहिल्याच दिवशी स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला आहे. त्याने ट्रेविस हेडची विकेट मिळवताच कसोटी क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. जेम्स अँडरसननंतर असा कारनामा करणारा तो दुसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे.

स्टुअर्ट ब्रॉडचा प्रवास..

स्टुअर्ट ब्रॉडचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्याला आपल्या कारकीर्दीत अनेक चढ उतार पाहायला मिळाले आहेत. मात्र त्याने माघार घेतली नाही. डिसेंबर २००७ रोजी तो आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. श्रीलंकेविरुध्द झालेल्या या सामन्यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉडची ओळख म्हणजे युवराज सिंगसमोर ६ षटकार खाणारा गोलंदाज अशी होती.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते. असं सर्व असताना देखील त्याने आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली. कसोटी क्रिकेटवर अधिक भर देण्यासाठी त्याने २०१४ नंतर टी -२० आणि २०१६ नंतर वनडे क्रिकेट खेळणं सोडून दिलं होतं. (Latest sports updates)

आतापर्यंत त्याने १६६ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७ च्या सरासरीने ६०० गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने २० वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. इंग्लंड संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत तो ५ व्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning joint stiffness: सकाळच्या वेळी हात-पाय आखडतात का? अजिबात करू नका दुर्लक्ष, हा असू शकतो भयंकर आजाराचा इशारा

Astrology Predictions : शनीची उलटी चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार? नोकरी, पैसा आणि नात्यांवर होणार परिणाम

Lemon Water Vs Ginger Water: लिंबू की आल्याचे पाणी, वजन कमी करण्यासाठी काय प्यावे?

Ramayana Yash Look: ३३ किलोचे कपडे, १.८ किलोचा मुकुट; 'रामायण'मध्ये असा साकारला यशचा रावण लूक!

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT