Steve Smith Retirement  Saam Tv
Sports

Steve Smith Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का; स्टीव्ह स्मिथचा वनडे क्रिकेटला रामराम

Steve Smith Retirement IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Bharat Jadhav

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. ऑस्ट्रेलियन संघाने स्मिथच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळली होती. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर स्मिथने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय.

आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफीमधील सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. या पराभवासह संघ स्पर्धेतून बाहेर पडला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का मिळालाय. स्मिथने वनडेतून निवृत्ती घेतलीय. स्मिथने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना टीम इंडियाविरुद्ध खेळला. स्टीव्ह स्मिथचा एकदिवशीय करिअर शानदार होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी १७० सामन्यात ५८०० धावा केल्या आहेत.

स्मिथने या फॉर्मेटमध्ये १२ शतक आणि ३५ अर्धशतकं त्याने केली आहेत. त्याची सर्वोत्तम वनडे धावसंख्या १६४ धावा आहे. स्मिथने अनेक मोठ्या प्रसंगी ऑस्ट्रेलियासाठी कमालीची खेळी करत सामने जिंकवून दिली आहेत. भारताविरुद्धही त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण आता त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : सतत डोकं दुखतंय? असू शकतो हाय बीपीचा धोका, 'ही' ३ लक्षणं वेळीच ओळखा, नाहीतर...

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT