IPL 2022- Rohit Sharma
IPL 2022- Rohit Sharma SAAM TV
क्रीडा | IPL

मुंबईच्या सलग 8व्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचे विधान, म्हणाला...

Pravin

सध्या आयपीएलचा 15वा (IPL 2022) हंगाम सुरु आहे. यंदाच्या हंगामात १० संघ आहेत, दोन संघ नव्याने दाखल झाले आहेत. नवीन संघांनी लीगमध्ये चमकदार कामगिरी केली असताना, जुन्या संघांचा खेळ मात्र होताना दिसत नाहीये. चार वेळची चॅम्पियन चेन्नई (CSK) गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे, तर पाच वेळची विजेती मुंबई इंडियन्स (MI) शेवटच्या स्थानावर आहे. यावेळी आयपीएलमध्ये मुंबईला सलग ८ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रविवारी लखनौविरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) लिहिले की आम्ही या स्पर्धेत आमचे सर्वोत्तम प्रदर्शन केले नाही, परंतु असे घडते अनेक क्रीडा दिग्गज या टप्प्यातून गेले आहेत. पण मला हा संघ आणि येथील वातावरण आवडते. आम्ही आमच्या शुभचिंतकांचे देखील कौतुक करू इच्छितो ज्यांनी आतापर्यंत या संघावर विश्वास ठेवला आणि अतूट निष्ठा दाखवली.

दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने पाच वेळा आयपीएलचा हंगाम आपल्या नावावर केला आहे. मागच्या हंगामात मुंबईचा संघाकडे जे दिग्गज होते ते यंदाच्या हंगामात मुंबईकडे राहिले नाहीत. ट्रेट बोल्ट, हार्दीक पांड्या, राहुल चहर यासारखे खेळाडू मुंबईच्या संघाने गमावले आणि ते खेळाडू त्यांच्या संघात चमकदार कामगिरी करत आहेत. दिल्लीचा कोच आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडूने मुंबईच्या संघावर टीका केली. तो म्हणाला मुंबई लिलावात चुकली त्यांनी त्यांचे महत्त्वाचे खेळाडू रिटने नाही केले, त्याचबरोबर इशान किशनला एवढी रक्कम देऊन संघात घेतले.

मुंबई इंडियन्स संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह, फॅबियन ऍलन, मुरुगन अश्विन, तमाल मिल्स, बेसिल थंपी, अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, राहुल बुद्धी, अर्शद खान.
Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT