भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामध्ये टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत ७ धावांनी विजय मिळवला. यासह दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने निवृत्तीची घोषणा केली होती.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरनेही निवृत्ती जाहीर केल्याची जोरदार चर्चा रंगली. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली होती. ज्यावरून नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला की, त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र आता त्याने आपल्या निवृत्तीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावर डेव्हिड मिलर निवृत्त झाला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्याने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर निवृत्ती घेतली नसल्याचं म्हटलं आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ' मी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. मी दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणं सुरु ठेवणार आहे. मला अजून सर्वात्तम कामगिरी करायची आहे.'
भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर डेव्हिड मिलरने स्टोरी शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. या दरम्यान त्याने भावुक करणारी स्टोरी शेअर केली होती. त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले होते की, ' 'मला खुप दु:ख झालंय. दोन दिवसांपूर्वी जे झालं, ते पचवणं खूप कठीण आहे. मला आता काय वाटतंय हे मी शब्दात सांगु शकत नाही.' यानंतर त्याने संघातील खेळाडूंचं कौतुक केलं. हा प्रवास शानदार होता. पूर्ण महिन्यात अनेक चढउतार आले. मात्र हेच वाटतं की,आमचा संघ मजबूत आहे.' मिलरने केलेल्या या पोस्टनंतर त्याने निवृत्ती जाहीर केलीये अशी चर्चा रंगली होती. मात्र आता त्याने निवृ्त्तीबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे तो यापुढेही दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसून येणार आहे.
बारबाडोसमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने अर्धशतकी खेळी केली. त्याने संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं. शेवटी डेव्हिड मिलरने पूर्ण जोर लावला. मात्र शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सू्र्यकुमार यादवने शानदार झेल टिपला आणि मिलरला माघारी धाडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.