indian cricket team  twitter
क्रीडा

Jaydev Unadkat: 400 विकेट्स घेऊनही Duleep Trophy तून वगळलं; स्टार गोलंदाज आता इंग्लंडमध्ये खेळणार!

Jaydev Unadkat Will Play In County Cricket: भारतीय संघातील स्टार खेळाडू जयदेव उनाडकटला दुलीप ट्रॉफीसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. आता त्याने इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

आयपीएलमध्ये शानदार कामगिरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेट्सचा पाऊस पाडूनही जयदेव उनाडकटला भारतीय संघात कमबॅक होत नाहीये. त्यामुळे डावखुऱ्या हाताच्या या मध्यमगती वेगवान गोलंदाजाने इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट स्पर्धेत तो ससेक्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. ससेक्स संघाकडून खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वी देखील तो या संघाकडून खेळताना दिसला आहे.

भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न

काही दिवसांपूर्वीच आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी ४ संघांची घोषणा करण्यात आली होती. या संघात जयदेव उनाडकटला स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्याने इंग्लंडची वाट धरली आहे. भारतीय संघात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करुन तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी दावा करु शकतो.

पोस्ट शेअर करत दिली माहिती

भारतीय संघातील स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारादेखील याच संघाकडून खेळतो. सौराष्ट्र संघातील हे दोन्ही खेळाडू यावेळीही ससेक्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहेत. जयदेव उनाडकटचं संघात कमबॅक होताच, ससेक्स क्लबच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये संघात कमबॅक झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिसून आला आहे. दरम्यान तो म्हणाला की, 'पुन्हा एकदा या संघात येऊन मला आनंद झाला आहे. हे माझं दुसरं घर आहे. आमच्या संघाने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मी आशा करतो, की स्पर्धेच्या उत्तरार्धातही आम्ही आणखी चांगली कामगिरी करु.

असा राहिलाय रेकॉर्ड

जयदेव उनाडकटला तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅट खेळण्याची संधी मिळाली आहे. ४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ३ गडी बाद केले आहेत. तर ८ वनडे सामन्यांमध्ये त्याला ९ गडी बाद करता आले आहेत. यासह १० टी-२० सामन्यांमध्ये त्याला १४ गडी बाद करता आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT