फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतून भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय गोल्फ खेळाडू दिक्षा सागरच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. मात्र ती ठिक असून तिला गंभीर दुखापत झालेली नाही.
पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत ती गोल्फमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाली आहे. गोल्फला ७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या अपघातात दिक्षा ठिक आहे. मात्र तिच्या आईंना गंभीर दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे.
माध्यमातील वृत्तानुसार हा अपघात ३० जुलैला झाला होता. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी त्या कारमध्ये तिच्या कुटुंबातील ४ सदस्य होते. दिक्षाबद्दल बोलायचं झालं, तर तिने २०१९ मध्ये आपल्या गोल्फ कारकिर्दीला सुरुवात केली होती. वर्ल्ड रँकिगच्या बळावर तिने थेट पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश केला आहे.
दिक्षाला बहिरेपणाचा त्रास आहे. यापूर्वी तिने २०१७ मध्ये डेफलंपिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. यासह २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत तिला पदकावर नाव कोरता आलं नव्हतं. मात्र या स्पर्धेत एन्ट्री करताच तिच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली होती. ती डेफलंपिक्स आणि ऑलिंपिक स्पर्धा खेळणारी जगातील पहिलीच खेळाडू ठरली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.