rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

R Ashwin On Rohit Sharma: मुंबई इंडियन्स संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेपू्र्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या लिलावापूर्वी सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत. मात्र किती खेळाडूंना रिटेन करता येणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज सारखे संघ रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी रेकॉर्डब्रेक बोली लावायलाही तयार आहेत.

भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, ' तुम्ही रोहितसारखाच विचार करुन पाहा ना, हे मुळीच चुकीचं नाही. मी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. मी अनेकदा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे.मी जरी कर्णधार नसेल, तरी मी आनंदाने मुंबईला जातोय. जर मी मुंबईसाठी खेळतोय तर हे माझ्यासाठी शानदार आहे. मला खात्री आहे की, बहुतांश खेळाडू असेच आहेत. काही खेळाडू असे असतात,ज्यांच्यासाठी पैसा फार महत्वाचा नसतो.'

रोहितला काढून हार्दिकला बनवलं कर्णधार

आयपीएल २०१३ मध्ये रोहितकडे मुंबई इंडियन्स संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या तेव्हापासून ते २०२४ पर्यंत त्याने मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस आयपीएल चॅम्पियन बनवलं. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर संघाची जबाबदारीही सोपवली.

रोहित शर्माला अचानक कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रोहित शर्मा मुबंई इंडियन्स संघाची साथ सोडणारअसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आर अश्विनचं मत जरा वेगळं आहे. त्याच्या मते, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार नाही. तो मुंबई इंडियन्ससाठी खेळणं सुरु ठेवणार.

आयपीएल २०२४ स्पर्धेत फलंदाजीत शानदार कामगिरी

रोहित शर्माने आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. त्याने या हंगामात फलंदाजी करताना १४ सामन्यांमध्ये १५० च्या स्ट्राईक रेटने ४१७ धावा केल्या होत्या. यादरम्यान नाबाद १०५ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT