Arundhati Reddy Fined By ICC: भारतीय संघाने आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. पहिला सामना गमावून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानला पराभूत करायचं होतं. भारताच्या या विजयात अरुंधती रेड्डीने मोलाची भूमिका बजावली. तिने या सामन्यात गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. मात्र यादरम्यान तिने एक चूक केली होती. आता आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे.
भारतीय संघातील गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि पाकिस्तानचा डाव अवघ्या १०५ धावांवर हाणून पाडला. भारतीय संघाकडून अरुंधती रेड्डीने या सामन्यात गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले.
तिने पहिल्या डावातील २० व्या षटकात निदा डारला बाद करत माघारी धाडलं. दरम्यान तिला बाद केल्यानंतर तिने आक्रमक होऊन जल्लोष केला. त्यावेळी तिने पाकिस्तानच्या पॅव्हेलियनच्या दिशेने पाहून इशारा देखील केला. असं करताना तिने आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई करत १ डिमेरीट पॉईंट दिला आहे.
आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ नुसार, जर कुठल्याही खेळाडूने मैदानात अभद्र भाषेचा वापर केला, शिवीगाळ केला किंवा चुकीचा इशारा केल्यास हे लेव्हल १ चा गुन्हा मानले जाते. यासाठी कमीत कमी शिक्षा म्हणजे, त्या खेळाडूला १ डिमेरीट पॉईंट दिला जातो. तर मोठी शिक्षा म्हणजे, या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खेळाडूच्या मॅच फी वर ५० टक्के दंड आकारला जातो. दरम्यान आयसीसीने अरुंधती रेड्डीला १ डिमेरीट पॉईंट देण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात पाकिस्तानन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत एका पाठोपाठ एक फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. भारतीय संघाकडून अंरुधतीने ४ षटकात १९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर श्रेयांका पाटीलने ४ षटकात १२ धावा खर्च करत २ गडी बाद केले. या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानचा डाव अवघ्या १०५ धावांवर आटोपला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.