abhishek sharma twitter
Sports

Abhishek Sharma: हे चुकलंच! अभिषेक शर्मासोबत दिल्ली विमानतळावर भयानक प्रकार घडला

Abhishek Sharma News In Hindi: भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मासोबत भयानक प्रकार घडला आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत झालेल्या घटनेची माहिती दिली आहे.

Ankush Dhavre

भारतीय टी-२० संघातील स्टार फलंदाज अभिषेक शर्मासोबत गैरवर्तवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. ज्यामुळे त्याची फ्लाईट मिस झाली. आपल्यासोबत चुकीचं काहीतरी घडलंय, याची माहिती मिळताच अभिषेक शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करुन नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

अभिषेक शर्माने इंडिगो एअरलाईन्सला झापलं

अभिषेक शर्मा इंडिगो एअरलाईन्सने प्रवास करणार होता. मात्र इंडिगो एअरलाईन्सच्या स्टाफने त्याला चुकीची वागणूक दिली. त्यामुळे त्याची फ्लाईट मिस झाली. या घटनेची माहिती देताना त्याने एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये त्याने लिहिले की, ' दिल्ली एअरपोर्टवर इंडिगो एअरलाईन्सच्या स्टाफने जी वागणूक दिली, ती अत्यंच चुकीची होती. स्टाफकडून मिळालेली वागणूक, मुख्यत: काऊंटर मॅनेजर सुष्मिता मित्तलने दिलेली वागणूक अस्वीकार्य होती.'

त्याने पुढे लिहिले की, 'मी योग्यवेळी काऊंटरवर पोहोचलो होतो.पण त्यांनी मला कारण नसतानाही दुसऱ्या काऊंटवर जायला सांगितलं. त्यानंतर चेकइन बंद झालं होतं. त्यामुळे माझी फ्लाईट मिस झाली.

मला एक दिवसाची सुट्टी मिळाली होती. ती देखील वाया गेली आहे, याहून वाईट म्हणजे, ते मदत करायला देखील तयार नाहीत. हा आतापर्यंतचा सर्वात वाईट एअरलाईन अनुभव आहे. इतका वाईट स्टाफ आणि मॅनेजमेंट मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं.'

इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका खेळणार

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना २२ फेब्रुवारीला रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या मालिकेसाठी अभिषेक शर्मालाही संघात स्थान देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वांगणी ग्रामीण रुग्णालयात बुरशी लागलेली औषधं, मनसेकडून कडक कारवाईची मागणी

Pune : ८०० स्टॉल, ५० लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी

गुड न्यूज! लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, ३१ व्या हफ्ताचे १५०० रुपये खात्यात जमा

School Holiday: महत्त्वाची बातमी! २७ डिसेंबरला सुट्टी जाहीर; शाळा-कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद

Mumbai Local Train : AC लोकलमधून प्रवास करताना तिकीट असूनही भरावा लागेल दंड; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT