karun nair twitter
क्रीडा

Maharaja T20 League: 48 चेंडूत 124 धावा..टीम इंडियातून बाहेर असलेल्या फलंदाजाने घातला राडा!

Karun Nair Century In Maharaja T20 League: भारतीय संघातील स्टार फलंदाज करुण नायर हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी वाट पाहतोय. दरम्यान त्याने महाराजा टी-२० लीग स्पर्धेत तुफानी शतक झळकावलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघातून बाहेर असलेल्या फलंदाजाने तुफान कामगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या महाराजा टी -२० ट्रॉफी स्पर्धेत या फलंदाजाने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे.

या स्पर्धेत मैसूर वॉरियर्स आणि मंगलोर ड्रॅगन्स यांच्यात झालेल्या सामन्यात करुण नायरची बॅट चांगलीच तळपली आहे. करुणने बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात १३ चौकार आणि ९ षटकारांचा साहाय्याने अवघ्या ४८ चेंडूत १२४ धावा ठोकल्या आहेत.

करुण नायरने (Karun Nair) भारतीय संघाकडून खेळताना कसोटीत तिहेरी शतक झळकावलं आहे. असा कारनामा करणारा तो वीरेंद्र सेहवागनंतर दुसराच फलंदाज आहे. दरम्यान त्याच्या तुफानी शतकी खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाची धावसंख्या ४ गडी बाद २२६ धावांवर पोहोचवली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, करुण नायर या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. संघातील सलामीवीर फलंदाज अजित कार्तिक अवघ्या ११ धावा करत तंबूत परतला.

त्यानंतर करुण नायरने संघाचा डाव सांभाळला. एसयु कार्तिकसोबत मिळून ४७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सुमित कुमारने १५ आणि समित द्रविडने १६ धावा केल्या. त्याने तुफान फटकेबाजी करत पाचव्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या. यासह आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.

भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी ठोकला दावा

करुण नायरने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळताना तिहेरी शतक झळकावत आपलं नाव जगप्रसिद्ध केलं होतं. २०१६ मध्ये झालेल्या या सामन्यात त्याने ३०३ धावांची तुफानी खेळी केली होती.

त्यानंतर मार्च २०१७ मध्ये तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. शेवटचा सामना खेळून ७ वर्षे उलटली असली तरीदेखील त्याने कमबॅक करण्याची आशा सोडलेली नाही. तो अजूनही भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी जोर लावतोय.

करुण नायरने ईएसपीएन क्रीकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ' रोज उठायचं आणि भारतीय कसोटी संघात कमबॅक करायचं स्वप्नं पाहणं हे खूप रोमांचक आहे. हे मला पुढे जाण्यासाठी मदत करतं. मला तरी वाटतंय मी चांगली फलंदाजी करतोय. माझी मनस्थिती चांगली आहे. मी फक्त संधीची वाट पाहतोय. मला संधी मिळाली की, मला त्या संधीचं सोनं करून दाखवायचं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT