prithvi shaw twitter
Sports

Prithvi Shaw: वाढतं वजन अन् उद्धटपणा नडला? टीम इंडियानंतर मुंबई संघातूनही पृथ्वी शॉची सुट्टी

Prithvi Shaw News In Marathi: भारतीय संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉला मुंबई संघातूनही बाहेर करण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

Prithvi Shaw, Mumbai Cricket Team: मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ला भविष्यातील सचिन तेंडुलकर म्हटलं जात होतं. पदार्पणातील सामन्यात त्याने शतक झळकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र त्यानंतर फॉर्म, वैयक्तिक वाद आणि मुळ मुद्दा म्हणजे, फिटनेसमुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं आहे.

जवळपास ४ वर्ष त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. मात्र आता त्याला मुंबई संघातून देखील बाहेर केलं गेलं आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत मुंबईने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबईने दमदार कमबॅक केलं. आता स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबईचा सामना त्रिपुराविरुद्ध होणार आहे.

या सामन्यासाठी मुंबई संघात बदल करण्यात आला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू तनुष कोटीयानचा ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या भारतीय अ संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला रिलीज करण्यात आलं आहे. तर त्याच्या जागी फिरकीपटू कर्श कोठारीला संघात स्थान देण्यात आलं आहे.

पृथ्वी शॉ संघाबाहेर

मुंबई संघातून पृथ्वी शॉ ची सुट्टी करण्यात आली आहे. त्याच्या जागी अखिल हेरवाडकरला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याला ४१ रणजी सामने खेळण्याचा अनुभव आहे. पृथ्वी शॉ ने संघाबाहेर काढताच स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने, मी ब्रेक घेतोय... असं लिहिलंय. मात्र यात किती तथ्य आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

पृथ्वी शॉ ला याआधीही फिटनेसवर लक्ष देण्याची वॉर्निंग दिली गेली होती. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केल्याने त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, निवडकर्त्यांना असं वाटतंय की, पृथ्वी शॉ चं वजन जास्त आहे. संघातील इतर खेळाडू नेट्समध्ये आणि सराव सत्रात नियमीत सहभाग घेतात, मात्र पृथ्वी शॉ या गोष्टींचं गांभिर्याणे पालन करत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT