player retirement  saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया चषक तोंडावर असताना संघाला मोठा धक्का! दिग्गज खेळाडूची ३३ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा

Lahiru Thirimanne Retirement: दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

Cricketer Retirement: आशिया चषक २०२३ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या ३० ऑगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये केले जाणार आहे.

दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. ३३ वर्षीय लहिरू थिरिमानेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. (Lahiru Thirimanne Retirement)

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज लहिरू थिरिमानने गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. मार्च २०२२ मध्ये तो श्रीलंकेसाठी शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर तो संघाबाहेर झाला.

त्याने श्रीलंकेसाठी खेळताना वनडे क्रिकेटमध्ये ४ तर कसोटी क्रिकेटमध्ये ३ शतके झळकावली आहेत. फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील तो चमकदार कामगिरी करताना दिसून आला आहे. त्याने एक भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे.

लहिरू थिरिमानेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'देशासाठी खेळणं अभिमानाची बाब आहे. गेल्या १३ वर्षात दिलेला गोड आठवणींबद्दल मी आभारी आहे. माझ्या या प्रवासादरम्यान मला शुभेच्छा देणाऱ्यांचे मी आभार मानतो. आता नवीन प्रवासाला सुरुवात होईल..' (Latest sports updates)

लहिरू थिरिमानेची कारकिर्द..

लहिरू थिरिमाने श्रीलंकेसाठी ४४ कसोटी सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. यादरम्यान त्याने २०८८ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३ शतके आणि १० अर्धशतके झळकावली आहेत. तर १५५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर त्याने १२७ वनडे सामन्यांमध्ये ३१९४ धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ४ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT