australia and srilanka cricket team twitter
क्रीडा

T-20 World Cup 2024: श्रीलंकेचा खेळ पावसानं बिघडवला! सामना रद्द होताच स्पर्धेतून बाहेर तर AUS ची सुपर ८ मध्ये एन्ट्री

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. सर्व संघांचं लक्ष सुपर ८ मध्ये पोहचण्यावर असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे. श्रीलंकेने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १ सामना पावसामुळे रद्द झाला.

श्रीलंकेचा ड गटात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा पुढील सामना नेपाळविरुद्ध होणार होता. मात्र या सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामना रद्द झाल्याचा दक्षिण आफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे. तर श्रीलंकेच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे. कारण श्रीलंकेचा १ सामना शिल्लक आहे. हा सामना कितीही मोठ्या फरकाने जिंकला तरीदेखील हा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करू शकणार नाही.

श्रीलंकेने पुढील सामना जिंकला तरी हा संघ ३ गुणांपर्यंत पोहोचेल. बांगलादेश विरुद्ध नेदरलँड यांच्यातील सामना झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ अधिकृतरित्या स्पर्धेतून बाहेर पडेल. श्रीलंकेला अजूनही सुपर ८ मध्ये जाण्याची संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी दक्षिण आफ्रिका सोडून इतर कुठलाच संघ ३ गुणांचा पुढं जायला नको. यासह बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यात होणारा सामनाही पावसामुळे रद्द झाला पाहिजे.

यासह ब गटातून ओमानचा संघही बाहेर पडला आहे. ओमानने ३ सामने गमावले आहेत. येणाऱ्या काही सामन्यांमध्ये लवकरच सुपर ८ चं चित्र स्पष्ट होईल. भारतीय संघाकडे अमेरिकेला पराभूत करून सुपर ८ मध्ये जाण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT