SRH vs RR Saam Digital
Sports

SRH vs RR : नितीश रेड्डीची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals/IPL 2024 : नितीश कुमार रेड्डी आणि ट्रॅविश हेड यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २०२ धावांच लक्ष्य राजस्थान रॉयलसोर ठेवलं आहे. नितेश कुमार रेड्डीने ८ षटकार ठोकत ७६ धावा केल्या.

Sandeep Gawade

नितीश कुमार रेड्डी आणि ट्रॅविश हेड यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २०२ धावांच लक्ष्य राजस्थान रॉयलसोर ठेवलं आहे. नितेश कुमार रेड्डीने ८ षटकार ठोकत ७६ धावा केल्या. तर ट्रॅविश हेडने ५८ धावांचं योगदान दिलं. क्लासेनने शेवटी ३ षटकार ठोकत १९ बॉलमध्ये ४२ धावा करत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली आहे.

कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आवेश खानने अभिषेक शर्माला बाद करून राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर संदीप शर्माने अनमोलप्रीत सिंगला बाद केलं. पॉवरप्लेमध्ये हैदराबाद संघाला दोन विकेट्सवर केवळ ३७ धावा करता आल्या. मात्र, नितेश रेड्डीसह हेडने नी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडून हैदराबादची सामन्यात वापसी केली. हेडने टा आयपीएलमधलं चौथं अर्धशतकही झळकावलं.

हेड बाद झाल्यानंतर नितेश रेड्डीने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. त्याला दुहेनरिक क्लासेनची चांगली साथ मिळाली. क्लासेननेही चौकार षटकार ठोकले. हेड, नितेश आणि क्लासेनच्या स्फोटक खेळीमुळे हैदराबादने ६० चेंडूत १२६ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. क्लासेन आणि नितीशने चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल राजस्थानला चांगलाच महागडा पडला. त्याच्या चार षटकात ६२ धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

SCROLL FOR NEXT