SRH vs LSG Playing 11 prediction sunrisers hyderabad vs lucknow super giants playing XI news in marathi amd2000 twitter
Sports

SRH vs LSG,IPL 2024: हैदराबाद- लखनऊमध्ये काँटे की टक्कर! या सामन्यासाठी अशी असू शकते प्लेइंग ११

SRH VS LSG,Playing 11 Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा हाय व्हॉल्टेज सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपासून ते आतापर्यंत या मैदानावर जितके सामने खेळले गेले आहेत. त्या सामन्यांमध्ये फलंदाजांची चांदी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये २०० पेक्षा अधिक धावा बनवल्या गेल्या आहेत. यादरम्यान सरासरी धावसंख्या २१२ इतकी राहिली आहे.

अशी असेल सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११..

सनरायझर्स हैदराबाद संघातील सर्वच खेळाडू फिट आहेत. पॅट कमिन्सने गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच मार्कस स्टोइनिस, निकोलस पुरन आणि दिपक हुड्डासारख्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट/उमरान मलिक. (इम्पॅक्ट प्लेयर: टी नटराजन)

अशी असेल लखनऊ सुपर जायंट्स संघाची प्लेइंग ११..

मोहसिन खानने डाव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. त्याने ५४ चेंडूंमध्ये ७ गडी बाद केले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची जोडी फोडण्याची जबाबदारी असणार आहे. या सामन्यासाठी क्विंटन डी कॉकचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, दिपक हुड्डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकुर. (इम्पॅक्ट प्लेयर - अर्शिन कुलकर्णी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur-Mumbai Flight : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून सुरु होणार सोलापूर-मुंबई विमानसेवा | VIDEO

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Accident News : वाळूने भरलेल्या टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले, मृतदेहाचे तुकडे, भंडाऱ्यात भयानक अपघात

Ravi Naik passes away : माजी मुख्यमंत्र्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, संपूर्ण गोव्यावर शोककळा

Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT