Abhishek Sharma Run Out x (twitter)
Sports

SRH Vs DC Live Match : ट्रेव्हिस हेडची एक चूक अन् अभिषेक शर्मा झाला रनआउट, मैदानात गोंधळ; नेमकं काय घडलं? पाहा Video

Abhishek Sharma : ट्रेव्हिस हेडने धाव घेताना गोंधळ केल्याने अभिषेक शर्मा लवकरच बाद झाला. विपराज निगमने अभिषेक शर्माला रनआउट केले. हैदराबाद आणि दिल्ली हा सामना विशाखापट्टणम येथे सुरु आहे.

Yash Shirke

SRH Vs DC Live Match Update : विशाखापट्टणममध्ये आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीवीर अभिषेक शर्मा फक्त एक धाव करुन माघारी परतला आहे. विपराज निगमने अभिषेक शर्माला रनआउट केले. ट्रेव्हिस हेडच्या एका चुकीमुळे अभिषेकला बाहेर जावे लागले.

नेमकं काय घडलं?

मिचेल स्टार्क पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला. दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर ट्रेव्हिस हेडने चौकार मारले. स्टार्कने पाचवा बॉल यॉर्कर टाकला. हेडने त्यावर शॉट मारला. तो पीचजवळ असलेल्या विपराज निगमकडे गेला. शॉट मारल्यानंतर ट्रेव्हिस हेडचे लक्ष फक्त विपराज निगम आणि बॉलकडे होते. त्या नादात त्याने अभिषेककडे पाहिलेच नाही. तो दुसऱ्या बाजूला धावत गेला. पण सिंगल घेण्याचा कॉल न दिल्याने अभिषेक धावलाच नव्हता. हेड धावल्याने अभिषेकही स्ट्राईकर एन्डकडे धावला. या गोंधळामुळे अभिषेक शर्मा फक्त १ धाव करुन बाद झाला.

आयपीएल २०२५ मधील दुसरा डबल हेडर रविवार आज आहे. आजचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळला जात आहे. डबल हेडरमधला दुसरा सामना आज संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हा सामना गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे.

हैदराबादची प्लेईंग ११ -

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

दिल्लीची प्लेईंग ११ -

जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग' कोहलीला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला, "विराट स्वतःशीच लढाई थांबवेल तेव्हाच..."

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

SCROLL FOR NEXT