IPL 2026 Points Table saam tv
Sports

IPL 2026 Points Table: मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, पाहा कोण कुठल्या क्रमांकावर?

Mumbai Indians loss: मुंबई इंडियन्सला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला असून सनरायझर्स हैदराबादने मोठं लक्ष्य सहज पार केलं. या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला असून मुंबईची प्लेऑफची संधी आता अधिक कठीण झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात लाजीरवाणा पराभव मानला जातोय. दरम्यान हैदराबादच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये एक मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय.

मुंबई दिलेलं टार्गेट सनरायझर्स हैदराबादने १८. ४ ओव्हर्समध्ये ४ विकेट गमावून पूर्ण केलं. या विजयासोबत सनरायझर्स हैदराबादने पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतलीये. तर दुसरीकडे पाच वेळा विजेती असलेल्या मुंबईची अवस्था मात्र फारच बिकट झालीये.

सनरायझर्सचा सहावा विजय

सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये सहावा विजय मिळवला आहे. ९ सामन्यांनंतर हैदराबादच्या खात्यात १२ पॉईंट्स आहेत. ज्यामुळे ही टीम आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलीये. त्यांच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर आरसीबी असून त्यांनी ८ पैकी ६ सामने जिंकलेत. मात्र त्यांचं नेट रन रेट जास्त असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत. तर पहिल्या स्थानावर पंजाबची टीम असून चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे.

आयपीएल २०२६ च्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी ८ पैकी ४ सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्स सहाव्या स्थानावर असून त्यांनी ८ पैकी ३ सामने जिंकलेत. दिल्ली कॅपिटल्स सातव्या क्रमांकावर असून त्यांनीही दिल्लीनेही ८ पैकी ३ सामने जिंकले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या खात्यात ५ गुण आहेत. केकेआरने ८ सामने खेळले असून ते सध्या आठव्या क्रमांकावर आहेत. केकेआर ५ सामने हरले आहेत. त्यांनी दोन सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे.

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेला आणि गेल्या वर्षी क्वालिफायर २ मध्ये पोहोचलेली मुंबई इंडियन्स टीम आयपीएल २०२६ मध्ये फारच बिकट स्थितीत आहे. टीमने केवळ ४ गुण मिळवले असून ८ सामने खेळलेत. मुंबई इंडियन्स सध्या ९व्या स्थानावर असून, त्यांच्या मागे लखनऊ सुपर जायंट्स आहे. एलएसजीनेही या हंगामात ८ पैकी ६ सामने गमावले आहेत. आता दोन्ही टीम्ससाठी प्लेऑफमध्ये पोहोचणं खूपच कठीण झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack in Gym: जीममध्ये व्यायाम करताना ही ५ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात; मुंबई महापालिकेने घेतला निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पेट्रोलसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको; कॅन घेऊन रस्त्यावरच मांडला ठिय्या, VIDEO

Sabudana Vada Recipe: साबुदाणा वडा खाताना पीठ लागतं? मग रेसिपीमध्ये करा हा छोटा बदल, वाचा सिक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT