भारतीय युवा जलतरणपटू (Swimmer) श्रीहरी नटराज (Shrihari Natraj) आणि साजन प्रकाश (Sajan Prkash) आणि माना पटेलचीदेखील (Mana Patel) या तिघांची टोकियो ऑलम्पिकसाठी(Tokyo Olympic ) निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्वीमिंग फेडरेशनने (International Swimming Federation) तिघांच्याही ‘ए’ स्टँडर्ड टाइमला मान्यता देत दोघांनाही टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवले आहे. आनंदाची बाब म्हणजे यापूर्वी एकही भारतीय जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेता आला नव्हता, मात्र यंदा एक-दोन नव्हे तर तीन जलतरणपटू ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्त्व करणार आहेत. (Sreehari and Sajan along with Mana selected for Tokyo Olympics)
- ऑलिम्पिकसाठी निवड झालेला साजन पहिला भारतीय जलतरणपटू
साजन प्रकाशने (Sajan Prakash) रोममधल्या सेट्ट कोली स्विमिंग स्पर्धेत (Sette Colli Trophy) अप्रतिम कामगिरी करत टोक्यो ऑलम्पिकचं (Tokyo Olympics) तिकीटाचा मानकरी ठरला. साजन प्रकाश ऑलिम्पिक ‘ए’ स्टँडर्ड टाइम निश्चित करणारा पहिला भारतीय जलतरणपटू ठरला. साजन प्रकाशने रोममधील सेट्ट कोली स्पर्धेत पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात अप्रतिम कामगिरी पार पाडत ऑलिम्पिक पात्रतेसाठी 1 मिनिट 56.48 सेकंद वेळ निश्चित केला. 10 सेंकदाच्या फरकात साजनने ऑलिम्पिकचं तिकीटं मिळवलं. त्याची कामगिरी पाहता आंतरराष्ट्रीय स्वीमिंग फेडरेशनने (FINA) साजन प्रकाशच्या ‘ए’ स्टँडर्ड टाइमला मान्यता देत त्याला टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवले.
- श्रीहरी नटराजची निवड
श्रीहरी नटराजने (Shrihari Natraj) रविवारी राष्ट्रीय विक्रम नोंदवत टोकियो गेम्स ‘ए’ स्टँडर्ड पातळी 53.85 सेकंद गाठली. ऑलिम्पिकसाठी लागणारा क्वालिफिकेशन टाईममध्ये पात्र ठरत श्रीहरीने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. टाइम ट्रायलमध्ये जलतरणपटूंना इतर प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्याची संधी मिळत नाही परंतु त्यांचा वेळ सुधारण्याची संधी मिळते. श्रीहरीने सेटे कोली ट्रॉफी स्पर्धेत टाइम ट्रायलच्या दरम्यान 53.77 सेंकंदाचा टाईम घेतला. ऑलिम्पिक पात्रतेच्या शेवटच्या दिवशी वेळेच्या चाचणीमध्ये भाग घेण्यासाठी आयोजकांनी मान्यता दिली होती. नटराज पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.
- ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी माना पहिली भारतीय महिला जलतरणपटू
आनंदाची बाब म्हणजे, श्रीहरी आणि साजन यांच्यानंतर भारतीय महिला जलतरणपटू (Swimmer) माना पटेलचीदेखील (Mana Patel) आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) निवड करण्यात आली आहे, विशेष म्हणजे, ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय जलतरणपटू ठरली आहे. विद्यापीठाच्या कोट्याखालील ऑलिम्पिकमध्ये मनाला प्रवेश मिळाला आहे. 21 वर्षीय मना 100 मीटर बॅकस्ट्रोक इव्हेंटमध्ये भाग घेणार आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.