Virat Kohli Records saam tv
Sports

Virat Kohli Century : विराटचा पॅटर्नच वेगळा! शतक ठोकल्यानंतर असंच होतंय, आकडेवारी आली समोर

Sports News : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराटने 12 चेंडूत 3 करुन बाद झाला.

प्रविण वाकचौरे

Virat Kohli News :

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धमाकेदार खेळी करत शतक ठोकलं. विराटच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय सोपा झाला. फॉर्मात असलेल्या विराटसमोर श्रीलंकेच्या गोलंदाजांचं काय होणार याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष होतं. मात्र आजच्या सामन्यात विराट सपशेल फेल ठरला. विराट अवघ्या ३ धावा करुन बाद झाला. मात्र विराटचा मागील काही शतकीय खेळीनंतरचा हा पॅटर्न ठरलेला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराटने 12 चेंडूत 3 करुन बाद झाला. श्रीलंकचे फिरकीपटू ड्युनिथ वेललागेने विराटला बाद केलं. एखाद्या खेळाडूने शतक ठोकलं की तो फॉर्मात आहे, असं मानलं जातं. त्यानंतरच्या काही खेळींमध्ये त्याचा फॉर्म धावांच्या रुपात दिसून येतो. मात्र विराटबाबत तसं दिसून येत नाही. (Latest Marathi News)

विराटचा शतकीय खेळीनंतरची खेळी

विराट कोहलीच्या मागील काही शतकांवर नजर टाकली तर असं दिसून आलंय की, शतकीय खेळीनंतर त्याला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. मागील ७ शतकं पाहिली तर, ७१ वे शतक झळकावल्यानंतर विराट २ धावांवर बाद झाला. ७२ व्या शतकानंतर विराट १ धाव काढून बाद झाला.

७३वे, ७४वे, ७५वे आणि ७६वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर विराट कोहली पुढच्या डावात ४ धावा करून बाद झाला. ७७ वे शतक झळकावल्यानंतरही विराट अवघ्या ३ धावा करून बाद झाला. मात्र विराट ३ धावांवर बाद झाला असला तरी त्याच्या फॉर्मची चिंता नाही. कारण विराटने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके ठोकली आहेत. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सचिनच्या विक्रमापासून दोन पाऊल मागे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय शतके आहेत. विराट कोहली ७७ शतकांवर पोहोचला आहे. एकदिवसीय सामन्याचा विचार केला तर सचिनच्या नावावर ४९ शतके आहेत. तर विराटच्या नावे ४७ शतके आहेत. विराट लवकरच सचिनचा एकदिवसीय सामन्यातील विक्रम मोडेल अशी आशा सर्वच क्रिकेटरसिकांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Flood: अतिवृष्टीनं शेतीचा चिखल, सरकार ओला दुष्काळ’ जाहीर करणार का?

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

Maharashtra Live News Update: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'मुळे राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज? राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर

Crime: गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख, अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, बड्या राजकीय नेत्यासह १४ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT