Keshav Maharaj saam Tv
Sports

SA vs WI Test: विकेट घेतल्यानंतरचं सेलिब्रेशन केशव महाराजला पडलं महागात, थेट स्ट्रेचरवर जावं लागलं मैदानाबाहेर

विकेटच्या सेलिब्रेशनदरम्यान महाराज गंभीर जखमी झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Cricket News: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने संघाने २८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी चांगला गेला पण संघाचा स्टार फिरकी गोलंदाज केशव महाराजसाठी हा सामना तितकासा चांगला नव्हता. या सामन्यात विकेटच्या सेलिब्रेशनदरम्यान महाराज गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर न्यावं लागलं. (Latest Sports News)

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज काइल मेयर्स याला केश महाराजांनी एलबीडब्ल्यूद्वारे धावा केले. फील्ड अंपायरने मेयर्सला आऊट दिले नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने रिव्ह्यू घेतला आणि संघाच्या खात्यात आणखी एक विकेट जमा केली. यानंतर महाराजने ही विकेट सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. सेलिब्रेशनच्या उत्साहात तो जमिनीवर पडला. यानंतर मेडिकल टीम देखील मैदानात दाखल झाली. परिस्थिती इतकी बिघडली की केशव महाराजला स्ट्रेचरवर मैदानतून बाहेर न्यावं लागलं. (Latest News)

केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने आफ्रिकन संघासाठी 49 कसोटी सामन्यात 158 विकेट, 27 एकदिवसीय सामन्यात 29 विकेट आणि 25 टी-20 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 असा विजय मिळवला आहे. आफ्रिकेने पहिला सामना 87 धावांनी जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने 284 धावांनी मोठा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने 20 चौकारांच्या मदतीने 172 धावांची शानदार खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदीत एकाच दिवसात ३००० रुपयांची वाढ

Success Story: वडिलांचे छत्र हरपलं, कोणत्याही कोचिंगशिवाय एकदा नव्हे तर दोनदा केली UPSC क्रॅक; IAS दिव्या तंवर यांचा प्रवास

Maharashtra Politics : मुंबई मोठा राडा; ठाकरे आणि शिंदे गट भिडला, नेमकं काय घडलं? VIDEO

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT