नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौ येथे पार पडला. या सामन्यात आफ्रिकेने भारताचा नऊ धावांनी पराभव केला. भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मैदानात पाऊस पडल्याने सामना ४० षटकांचा खेळवण्यात आला. (South Africa won first one day match against India)
दक्षिण आफ्रिकेने ४० षटकात चार विकेट्स गमावून २४९ धावा केल्या. त्यानंतर २५० धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने ४० षटकात २४० धावाच केल्या. या इनिंगमध्ये टीम इंडियाने ८ विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरने ३० चेंडूत ५० धावा कुटल्या.तर संजू सॅमसने ६३ चेंडूत नाबाद ८६ धावांची आक्रमक खेळी केली.
यामध्ये ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे. भारताचा गोलंदाज शार्दुल ठाकुरनेही चांगली कामगिरी केली. त्याने ३१ चेंडूत ३३ धावा केल्या. परंतु, आफ्रिकेने दिलेलं २५० धावांचं लक्ष्य गाठण्यात टीम इंडियाला अपयश आलं. चाळीस षटकात २४० धावाच करता आल्याने भारताचा निसटता पराभव झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.