India vs South Africa 3rd t20 match saam tv
Sports

India vs South Africa : मालिकेच्या अखेरच्या टी२० सामन्यात भारत पराभूत; दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी जिंकला सामना

या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करत ४९ धावांनी सामना जिंकला.

Vishal Gangurde

India vs South Africa 3rd t20 match : भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा टी-२० सीरीजमधला शेवटचा सामना रंगतदार झाला. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताला २२८ धावांचे आव्हान दिले. या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करत ४९ धावांनी सामना जिंकला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा शून्य धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर एक धावा करून पायचीत झाला. टीम इंडियाच्या तीन षटकानंतर २ बाद १८ धावा झाल्या होत्या. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी काहीसा भारताचा डाव सावरला. मात्र, आक्रमक खेळणारा फलंदाज ऋषभ पंतच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला.

ऋषभ पंतनंतर दिनेश कार्तिक देखील तंबूत परतला. दिनेश कार्तिकने २१ चेंडूत चार चौके आणि चार षटकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. भारतीय संघाने ८६ धावांच्या आत पाच गडी गमावले. त्यानंतर भारताने हर्षल पटेलच्या रुपाने सहावा गडी गमावला. हर्षल १७ धावा करून बाद झाला. ११ षटकानंतर भारताच्या ६ गडी बाद १०९ धावा झाल्या होत्या. टीम इंडियाने अक्षर पटेलच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसला.

अक्षरने संघासाठी केवळ ९ धावांचे योगदान दिले. आर आश्विन अवघ्या दोन धावा करून तंबूत परतला. त्यानंतर दीपक चहरही अवघ्या १७ चेंडूवर ३१ धावा करत बाद झाला. चहरच्या रुपाने भारताला नववा धक्का बसला. २२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय क्रिकेट संघ १८.३ षटकात १७८ धावांवर गारद झाला. भारताने ४९ धावांनी अखेरचा सामना गमावला. मात्र, शेवटचा सामना हरला तरी भारताने २-१ ने मालिका जिंकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT