South Africa vs England  twitter
क्रीडा

South Africa vs England: वानखेडेवर षटकारांचा पाऊस! क्लासेन - यान्सेनच्या फटकेबाजीनं दक्षिण आफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर

South Africa vs England LIVE: या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने धावांचा डोंगर उभारला आहे.

Ankush Dhavre

South Africa vs England:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवत वानखेडे स्टेडियमवर तुफान फटकेबाजी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ७ गडी बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला आहे. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ४०० धावांची गरज आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. दुसऱ्याच चेंडूवर क्विंटन डी कॉक ४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रिजा हेंड्रिक्सने ७५ चेंडूंचा सामना करत ८५ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. तर रासी वान दर डुसेनने ६१ चेंडूंचा सामना करत ६० धावा चोपल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार एडेन मार्करमने ४४ चेंडूंचा सामना करत ४२ धावा केल्या. (Latest sports news)

हेनरिच क्सासेनचं शतक..

या सामन्यात हेनरिच क्सासेन पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १६३ इतकी होती. त्याने मार्करमसोबत मिळून डाव सांभाळला आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव पुढे नेला.

या डावात त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या डावात त्याने ६७ चेंडूंचा सामना करत १०९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. तर त्याला साथ देत मार्को यान्सेनने ४२ चेंडूंचा सामना करत ७५ धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

SCROLL FOR NEXT