South Africa vs England Result x ICC
Sports

SA vs ENG T20: शानदार गोलंदाजी आणि दमदार फिल्डिंगनं द.आफ्रिकेचा सलग ६ वा विजय; ७ धावांनी इंग्लंडचा पराभव

South Africa vs England Result: या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ गटात पहिले स्थान मिळवलंय. आफ्रिकेच्या संघाने आपले दोन्ही सामने जिंकले असून आता शेवटच्या सामन्यात त्यांचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे.

Bharat Jadhav

तगडी गोलंदाजी आणि काही आश्चर्यकारक झेल यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ फेरीत सलग दुसरा विजय नोंदवला. रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत या स्पर्धेतील सलग ६ वा विजय मिळवलाय. दोन्ही संघामधील हा सेंट लुसिया येथे खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला फक्त १५६ धावा करत्या आल्या. या लाजीरवाण्या पराभवामुळे इंग्लंडच्या संघाला सुपर-८ मध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी अखेरची संधी असणार आहे. त्यात त्यांना अमेरिकेला कशाही परिस्थिती पराभूत करावं लागणार आहे.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरी गाठलीय. या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग सहावा विजय आहे. संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाहीये. सुपर-८ मधील पहिला सामना जिंकणाऱ्या इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला शेवटच्या सामन्यात पराभूत करावे लागणार आहे.

डिकॉकची फटकेबाजी

या सामन्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेसाठी कभी खुशी- कभी गम सारखा होता. फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने (६५) येताच शानदार फलंदाजी केली, तर दुसरीकडे त्याचा सहकारी सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला मात्र फटकेबाजी करता आली नाही. मोठा फटका खेळताना त्याला संघर्ष करावा लागला. दरम्यान डी कॉकने या विश्वचषकातील संयुक्त सर्वात वेगवान अर्धशतक केलं. अवघ्या २२ चेंडूत अर्धशतक झळकावलं, तर फलंदाजीसाठी संघर्ष करणाऱ्या रिझाला २५ चेंडूत केवळ १९ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने १० षटकांत ८६ धावा केल्या होत्या.

यानंतर जोस बटलरने एक उत्कृष्ट झेल आणि अचूक धावबाद करून दक्षिण आफ्रिकेला नियंत्रणात आणलं. यावेळी मोईन अली आणि आदिल रशीद या फिरकी जोडीनं इंग्लंडला सामन्यात आव्हान कायम ठेवलं. आफ्रिकेच्या मात्र डेव्हिड मिलरने चांगली खेळी करत अवघ्या २८ चेंडूत ४३ धावा केल्या. मिलरच्या खेळीमुळे आफ्रिकेचा संघाने १६३ धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ४० धावांत सर्वाधिक ३ बळी घेतले.

शानदार गोलंदाजी

मागील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार फलंदाजी करणारा सलामीवीर फिल सॉल्टवर सर्वांच्या नजारा होत्या. परंतु कागिसो रबाडाच्या चेंडूवर रीझा हेंड्रिक्सने त्याला झेलबाद केलं. यानंतर रबाडासह दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलरला मोठी खेळी करण्यापासून रोखलं. ११ व्या षटकापर्यंत इंग्लंडने केवळ ६१ धावांवर बेअरस्टो, बटलर आणि मोईन अली यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. बेअरस्टो आणि बटलर यांना केशव महाराज (२/२५ ) बाद केले.

इंग्लंडची अशी स्थिती असताना मैदानात उतरलेल्या लियाम लिव्हिंगस्टन आणि हॅरी ब्रूक यांनी संघासाठी चांगली भागीदारी केली. या दोघांनी इंग्लंडला पुन्हा सामन्यात आणलं आणि संघाला विजयाजवळ नेलं. १७ व्या षटकात लिव्हिंग्स्टनने बार्टमॅनच्या षटकात १७ धावा ठोकल्या. तर हॅरी ब्रूकनेही ४ धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा वाढल्या.

शेवटच्या ३ षटकात फक्त २५ धावांची गरज होती पण १८ व्या षटकात रबाडाने लिव्हिंगस्टनची ( ३३) विकेट घेतली आणि फक्त ४ धावा दिल्या. त्यानंतर १९ व्या षटकात मार्को जॅन्सनने फक्त ७ धावा दिल्या. शेवटच्या ६ चेंडूत इंग्लंडला १४ धावांची गरज होती. ब्रूक (५३) एन्रिके नॉर्खियाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्यानंतर पुढच्या ५ चेंडूत केवळ ६ धावा इंग्लंडच्या खेळाडूंना करता आल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT