वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. तसेच जवळपास सर्वच संघांनी आपल्या संघाची घोषणा देखील केली आहे.
दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला दुहेरी धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje) आणि सिसांडा मगाला (Sisanda Magala) हे दोघेही वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर होऊ शकतात. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला फॉलो करा)
रेव्ह स्पोर्ट्सच्या वृत्तानूसार, एनरिक नॉर्खिया पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. तर सिसांडा मगाला गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. वर्ल्डकप तोंडावर असताना हे दोन्ही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त होणं ही दक्षिण आफ्रिकेसाठी चिंता वाढवणारी बाब आहे.
एनरिक नॉर्खिया हा ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसून आला होता. या मालिकेतील दुसऱ्या वनडेत त्याने ५ षटके गोलंदाजी केली होती.
त्यानंतर पाठीच्या दुखण्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने १३ चेंडूंचा सामना करत १० धावांचे योगदान दिले होते. मात्र या सामन्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला होता. (Latest sports updates)
वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का ..
एनरिक नॉर्खिया आणि सिसांडा मगाला हे दोघेही संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. वर्ल्डकपसारखी मोठी स्पर्धा तोंडावर असताना या खेळाडूंचं संघाबाहेर होणं हा दक्षिण आफ्रिका संघासाठी मोठा धक्का आहे. आता या दोन्ही खेळाडूंच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मगाला, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेने, रस्सी वॅन डर ड्यूसेन .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.