icc t20 world cup points table saam tv news
Sports

T-20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेचा सुपर ८ मध्ये प्रवेश! उर्वरीत कोणत्या संघाला किती चान्स? पाहा पॉईंट्स टेबल

T-20 World Cup 2024 Points Table: दक्षिण आफ्रिकेने संघ सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. उर्वरीत संघांना सुपर ८ मध्ये जाण्याचा किती चान्स आहे जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील २२ व्या सामन्यात पाकिस्तान आणि कॅनडा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. स्पर्धेतील २१ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. तर सुपर ८ मध्ये पोहचण्यासाठी इतर संघांमध्येही चुरशीची लढत सुरु आहे. दरम्यान कोणत्या संघाला किती चान्स आहे? जाणून घ्या.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत २० संघांनी सहभाग घेतला आहे. या २० संघांना ४ गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक गटात ५-५ संघांचा समावेश करण्यात आला आहे.

अ गट

या स्पर्धेसाठी अ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे. या गटात भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तर यजमान अमेरिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. कॅनडाने आतापर्यंत २ सामने जिंकले आहेत. यापैकी एक सामना जिंकला आहे, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने खेळले आहेत. यापैकी दोन्ही सामने गमावले आहेत. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर आयर्लंडचा संघ पाचव्या स्थानी आहे.

ब गट

या स्पर्धेसाठी इंग्लंड, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया आणि ओमान या संघांचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडने ३ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले आहेत. तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. स्कॉटलंडचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. २ पैकी १ सामना जिंकून नामिबियाचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आणि ओमानचा संघ पाचव्या स्थानी आहे.

क गट

या स्पर्धेसाठी वेस्टइंडिज, अफगाणिस्तान, युगांडा,न्यूझीलंड आणि पापूआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे. या गटातून अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिजने आतापर्यंत प्रत्येकी २-२ सामने खेळले आहेत. या गटात अफगाणिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. तर वेस्टइंडिजचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे गुण सारखे असले, तरीदेखील नेट रनरेटच्या बळावर अफगाणिस्तानचा संघ आघाडीवर आहे. युगांडाचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर पापूआ न्यू गिनीचा संघ चौथ्या आणि न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानी आहे.

ड गट

या गटात बांगलादेश,दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, श्रीलंका आणइ नेपाळ या संघांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेने ३ पैकी ३ सामने जिंकून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेश आणि नेदरलँड या दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने खेळले आहेत. बांगलादेशचा संघ दुसऱ्या स्थानी तर नेदरलँडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. नेपाळचा संघ चौथ्या आणि श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Mumbai : मुंबईत क्रिप्टो स्कीमचा भंडाफोड; तब्बल ६.५० कोटी लुबाडले, मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Health Care : अंगदुखीची कारणे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

SCROLL FOR NEXT