sourav ganguly saam tv
Sports

Sourav Ganguly Net Worth: कोट्यवधींच्या आलिशान कार अन् ४८ खोल्या असलेलं राजमहल! पाहा सौरव गांगुलीची एकूण संपत्ती

Happy Birthday Sourav Ganguly: या खास दिवशी सौरव गांगुली यांच्या नेट वर्थ आणि कार कलेक्शनबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Ankush Dhavre

Sourav Ganguly Birthday Special: भारतीय संघाचे कर्णधार सौरव गांगुली हे दिग्गज कर्णधारांपैकी एक आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये दादागिरी सौरव गांगुली यांनीच सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना क्रिकेटच्या मैदानावर दादा असं म्हटलं जातं.

बीसीसीआयच्या अध्यक्षांची भूमिका पार पाडणारे सौरव गांगुली आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान या खास दिवशी सौरव गांगुली यांच्या नेट वर्थ आणि कार कलेक्शनबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. ते अनेक मोठ मोठ्या कंपनीचे ब्रँड अँबेसेडर आहेत. एका सांकेतिक स्थळाने दिलेल्या माहितीनुसार ते एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी वर्षाला १ कोटी ३५ लाख रुपये घेतात. सौरव गांगुली यांनी बंगालचा शो दादागिरीमध्ये देखील काम केलं आहे. हा शो होस्ट करण्यासाठी ते एका आठवड्याचे १ कोटी रुपये घ्यायचे.

सौरव गांगुली यांचं कार कलेक्शन (Sourav Ganguly Car Collection)

सौरव गांगुली यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्यांच्याकडे ६२ लाख किंमत असलेली रेंज रोव्हर, ७२ लाख किमतीची मर्सिडीज जीएल, ऑडी, सीएलके कन्व्हर्टिबल, बीएमडब्ल्यू सीरीज कार आहेत. (Latest sports updates)

सौरव गांगुली यांचं आलिशान घर (Sourav Ganguly House)

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे राहणाऱ्या सौरव गांगुली यांचं घर खूप मोठं आहे. त्यांच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनी घर डेकोरेट करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

त्यांच्या घरातील इंटेरियर पाहून असं वाटेल की, तुम्ही एखाद्या राजमहालात प्रवेश केला आहे. १० कोटी रुपये किंमत असलेल्या या घरात ४८ खोल्या आहेत.

सौरव गांगुली यांची एकूण संपत्ती (Sourav Ganguly Net Worth)

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सौरव गांगुली यांची एकूण संपत्ती ३६५ कोटी रुपये इतकी आहे. सौरव गांगुली हे फुटबॉल क्लब मोहन बगान संघाचे सहमालक आहेत. मात्र, त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, देशमुख कुटुंब शिंदेंच्या शिवसेनेत

Black Tea: थकवा घालवायचाय? रोज सकाळी प्या ब्लॅक टी, शरीराला मिळतील अनेक फायदे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT