Rohit Sharma, Sofia Hayat Saam TV
Sports

"बेडवर तो तर..."  रोहित शर्माबाबत अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, 'त्या' बेडरूम सीक्रेटनं उडाली खळबळ, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma, Sofia Hayat : सोफिया हयातचा रोहित शर्माबाबतचा जुना दावा आणि खासगी आयुष्यावर केलेल्या कथित विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Namdeo Kumbhar

Sofia Hayat’s controversial statement Video : सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हयात पुन्हा एकदा एका नव्या वादात सापडली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये तिने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याबद्दल अत्यंत खासगी आणि आक्षेपार्ह विधान केले आहे. या विधानानंतर क्रिकेट चाहते आणि नेटकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय?

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सोफिया हयात रोहित शर्माबाबत बोलताना दिसत असून, तिने त्याच्या खाजगी आयुष्यावर भाष्य केले आहे. रोहितसोबतच्या जुन्या नात्याचा उल्लेख करत तिने धक्कादायक विधान केले. रोहित शर्मा खूप चांगला खेळाडू आहे. मी त्याच्यासोबत डेटवरही गेल्याचा दावा केला. सोफियाने व्हिडीओत बेडरूम सीक्रेट उघड केलं, तिचे हे बोलणे चाहत्यांच्या पचनी पडलेले नाही.

चाहत्यांकडून तीव्र विरोध आणि संताप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताच रोहित शर्माच्या समर्थकांनी सोफिया हयातवर कडक शब्दांत टीका केली आहे. "केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी (पब्लिसिटी स्टंट) आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी सोफिया अशा प्रकारची खालच्या पातळीची विधाने करत आहे," असा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

अनेक युझर्सनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करत भारतीय खेळाडूचा आदर ठेवण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जुन्या वादाची पुन्हा चर्चा

सोफिया हयात आणि रोहित शर्मा यांच्यातील कथित नात्याची चर्चा यापूर्वी २०१२ मध्येही झाली होती. त्यावेळी सोफियाने आपण रोहितला डेट करत असल्याचे ट्विट केले होते, परंतु रोहित शर्माने या दाव्यांवर कधीही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. आता कित्येक वर्षांनंतर सोफियाने पुन्हा एकदा हा जुना वाद उकरून काढल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट; भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी आमनेसामने, कोणी-कोणी भरला अर्ज?

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंची संचालकपदी बिनविरोध निवड

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ३ टक्क्यांनी वाढू शकतो महागाई भत्ता; पगार कितीने वाढणार?

वॉशिंग मशीनमध्ये कोणते कपडे धुवू नये? आणि धुतल्यास काय होते?

पुणे बंद पाडून दाखवाच! महापौर यांचं MPSC आंदोलकांना खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT