snake in cricket match saam tv
Sports

Snake In Stadium: बाप रे बाप! LIVE सामन्यात घुसला १० फुटाचा भलामोठा साप,खेळांडूनांही फुटला घाम; VIDEO व्हायरल

Snake In Live Cricket Match: सामना सुरू असताना अचानक सापाने एंट्री घेतल्याचे पाहायला मिळाले आहे

Ankush Dhavre

Snake Found In Live LPL Cricket Match: श्रीलंकेत लंका प्रिमीयर लीग २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात गाले टायटंस आणि दांबुला औरा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात असं काहीतरी घडलं ज्यामुळे सामना काही मिनिटे थांबवण्यात आला होता. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, गाले टायटंस आणि दांबुला औरा या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू असताना अचानक सापाने एंट्री घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हा सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. तसेच व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी देखील या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

व्हिडीओ जोरदार व्हायरल...

ही घटना दांबुला संघाची फलंदाजी सुरू असताना घडली. त्यावेळी गाले टायटंस संघाकडून शाकिब अल हसन गोलंदाजी करत होता. तो चेंडू टाकणार इतक्यात सापाने मैदानात एंट्री घेतली. त्यानंतर खेळ काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला. साप मैदानात आल्याचे पाहुन दोन्ही संघातील खेळाडूंना घाम फुटल्याचे पाहायला मिळाले होते. (Latest sports updates)

सुपर ओव्हरमध्ये लागला सामन्याचा निकाल..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर गाले टायटंस संआने दांबुला औरा संघावर जोरदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गाले टायटंस संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १८० धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दांबुला औरा संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १८० धावा केल्या होत्या. हा सामना बरोबरीत समाप्त झाला. सुपर ओव्हरमध्ये गाले टायटंस संआने दांबुला औरा संघावर जोरदार विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT