आयसीसी विमेंस वर्ल्डकप २०२५ चा खिताब जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरली. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सध्या टी-२० सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिला सामना रविवारी विशाखापट्टनमच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने ८ विकेट्सने विजय मिळवला. शिवाय टीम इंडियाची खेळाडू स्मृती मंधानाने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
स्मृती मंधाना विमेंस T20I क्रिकेटमध्ये ४००० रन्सचा आकडा गाठणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली आहे. तिने आतापर्यंत टी-२० फॉर्मेमध्ये तब्बल ४००७ रन्स केले आहेत. स्मृतीने १५४ सामन्यांमध्ये १४८ डावांत हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. यामध्ये तिने १ शतक आणि ३१ अर्धशतकं केली आहेत.
संपूर्ण महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंधाना T20I क्रिकेटमध्ये ४ हजारांचा आकडा पार करणारी दुसरी महिला क्रिकेटर ठरलीये. या लिस्टमध्ये न्यूझीलंडची सूजी बेट्स अव्वल स्थानावर आहे. तिच्या नावे या फॉर्मेटमध्ये ४७१६ रन्सची नोंद आहे. याशिवाय भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर देखील या लिस्टमध्ये जास्त मागे नाही. कौर ३६६९ रन्सवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टॉस जिंकल्यानंतर भारताने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी श्रीलंकेच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स गमावून १२१ रन्स केले. श्रीलंकेची ओपनिंग खेळाडू विश्मी गुणरत्ने हिने ३९ रन्स केले. तिच्या शिवाय कोणत्याही खेळाडूला २५ रन्सचा आकडाही पार करता आला नाही.
१२२ रन्सचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. शेफालीने वर्मा दुसऱ्या ओव्हरमध्ये ५ चेंडूंत ९ रन्स बनवून माघारी परतली. ९ ओव्हर्समध्ये ६७ च्या स्कोरवर भारताला स्मृती मंधानाच्या रूपात दुसरा धक्का बसला. मात्र त्यानंतर उतरलेल्या जेमिमा रोड्रिग्सने भारताला सामना जिंकवून दिला. तिने ६९ रन्सची नाबाद खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.