Cricket Viral Video  Instagram
Sports

Cricket Viral Video : पोरगं नाव काढणार! ५ वर्षीय चिमुकल्याचा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, मुंबई इंडियन्सने शेअर केला व्हिडीओ

Cricket News: एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Cricket Viral Video :

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा स्ट्रेट ड्राइव्ह मारण्यासाठी ओळखला जायचा. सचिनच्या बॅटला लागलेला चेंडू हा बाणासारखा सरळ जायचा.तर भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली हा कव्हर ड्राइव्ह मारण्यासाठी ओळखला जातो.

विराटचा कव्हर ड्राइव्ह पाहुन गोलंदाजही त्याच्या शॉटचं कौतुक करताना दिसुन येतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे,ज्यात चिमुकला कव्हर ड्राइव्ह मारताना दिसून येत आहे.चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल.. (Viral Video)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय ज्यात ५ वर्षाचा क्रिकेटपटू वजनदार क्रिकेट किट घालून कव्हर ड्राइव्ह मारताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओवर कॅप्शन देत त्यांनी '५ वर्षाच्या श्रीयान चा अप्रतीम 𝗰𝗼𝘃𝗲𝗿 𝗱𝗿𝗶𝘃𝗲' असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून आतापर्यंत ६ लाखांहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

हा व्हिडिओ वेदांत इंटरनॅशनल स्कूलचा असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, ५ वर्षाचा हा डावखुरा फलंदाज कव्हर ड्राइव्ह मारताना दिसतोय. भलाभल्या फलंदाजांनाही हा शॉट खेळणं कठीण जातं मात्र हा चिमुकला सहजतेने हा शॉट खेळताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकरी देखील भन्नाट प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

Palash Muchhal Net Worth : स्मृती मानधाना की पलाश मुच्छल कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

SCROLL FOR NEXT