csk team  Twitter
Sports

IPL 2023: CSK च्या ताफ्यात 'वजनदार' खेळाडूची एंट्री! कामगिरी पाहून विरोधी संघांना फुटेल घाम...

Sisanda Magala : काईल जेमिसन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. आता त्याच्या जागी एका नव्या खेळाडूची एंट्री झाली आहे.

Ankush Dhavre

Chennai Super kings: आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ३१ मार्चपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

पहिल्याच सामन्यात चेन्नई आणि गुजरात हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का बसला होता.

संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. आता त्याच्या जागी एका नव्या खेळाडूची एंट्री झाली आहे.

न्यूझीलंड संघातील अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.

मात्र पाठीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी एका नव्या खेळाडूला संधी दिली आहे. त्याच्या जागी ३२ वर्षीय वजनदार गोलंदाज सिसांडा मगालाला (Sisanda Magala संधी दिली गेली आहे.

त्याला सीएसकेने ५० लाख खर्च करत आपल्या ताफ्यात स्थान दिले आहे.

सिसांडाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी पदार्पण केले होते. तो आपल्या तुफान फटकेबाजीसाठी आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.

त्याची गोलंदाजी पाहून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनही प्रभावित झाला होता.

तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी केली होती. त्याने सनरायझर्स ईस्टर्न केप संघाकडून खेळताना १२ सामन्यांमध्ये १४ गडी बाद केले होते.

या स्पर्धेतील तो दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. अंतिम सामन्यात त्याने ३० धावा खर्च करत २ गडी बाद केले होते. सनरायझर्स संघाला अंतिम सामना जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kiran Mane : "लै लै लै भारी वाटलं..."; किरण माने यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, नव्या गाडीसोबत फोटो केला शेअर

Lord Shiva: शंकर महादेवांना 'नीलकंठ' का म्हणतात? निळ्या रंगामागचं रहस्य काय?

SCROLL FOR NEXT