t20 World Cup Sri Lanka Vs ZIM saam tv
Sports

जो जीता वही 'सिकंदर' ! टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेचा करिष्मा; आधी ऑस्ट्रेलियाला, आता श्रीलंकेला लोळवलं

T20 World Cup, SL vs Zim : टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठा उलटफेर झाला. झिम्बाब्वेनं आज झालेल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं. याआधी त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं.

Nandkumar Joshi

टी २० वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधी कुणाच्याही ध्यानीमनी नसलेला झिम्बाब्वे संघ, विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार तर दूरच, पण सुपर ८ मध्ये तरी पोहोचेल की नाही अशी शंका होती. पण स्पर्धा सुरू झाली, बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत अचानक प्रकाशझोतात आला. टी २० वर्ल्डकपमधला हा पहिला सर्वात मोठा उलटफेर होता. आता तर त्यांनी घरच्या मैदानावरच श्रीलंकेला लोळवून दुसरा सर्वात मोठा उलटफेर घडवून आणलाय. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रीलंकेला झिम्बाब्वेनं सहा विकेट्सनं पराभूत केलंय.

आयसीसी टी २० वर्ल्डकपमधील सुपर ८ मध्ये पोहोचलेल्या संघांची नावं निश्चित झाली आहेत. स्पर्धेचा थरार खरंतर या फेरीपासून सुरू होणार आहे. पण ग्रुप स्टेजचे काही सामने अद्याप सुरू आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज, गुरुवारी सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेला नमवून झिम्बाब्वेचा संघ 'सिकंदर' ठरलाय.

यजमान श्रीलंकेच्या संघानं टॉस जिंकला. पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १७८ धावा केल्या. पथुम निसांकानं ६२ धावा कुटल्या. तर पवन रत्नायके यानं ४४ धावांची स्फोटक खेळी केली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजरबानी, ब्रँड इवान्स आणि ग्रॅमी क्रीमर यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

झिम्बाब्वेचा संघ १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. ब्रायन बेनेट आणि मारुमानी या सलामीवीरांनी झक्कास सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचून पाया रचला. मारूमानी यानं ३४ धावा केल्या. बेनेट यानं एका बाजूनं किल्ला लढवला. बर्ल याच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी २९ धावा जोडल्या. संघाच्या ९८ धावा असताना बर्ल बाद झाला. त्यानंतर कर्णधार सिकंदर रजा फलंदाजीला आला. त्याने बेनेटला उत्तम साथ दिली. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी ६९ धावांची भागीदारी रचली. सिकंदरनं अवघ्या २६ चेंडूंत ४५ धावांची विस्फोटक खेळी केली. बेनेटनं नाबाद ६३ धावा केल्या.

झिम्बाब्वेचा संघ आता सुपर ८ मधील सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे. पहिला सामना २३ फेब्रुवारीला वेस्ट इंडीजविरुद्ध होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा हायव्होल्टेज सामना होईल. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय संघाविरुद्ध चेन्नईच्या मैदानावर लढत होईल. तर १ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकासारख्या तगड्या संघाविरुद्ध दिल्लीत ते भिडणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT