shubman gill catch video  saam tv
Sports

Shubman Gill Catch Video: चान्स पे डान्स! शॉट लेगला डाइव्ह मारत गिलचा भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

WI vs IND 1st Test, Day 1: शुभमन गिलने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill Catch: भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा स्तर हा गेल्या काही वर्षांमध्ये उंचावला आहे. भारतीय संघात विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि शुभमन गिल सारखे काही उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक आहेत.

नुकताच सुरू असलेल्या भारत विरूद्ध वेस्टइंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघाकडून उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला आहे. शुभमन गिलने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

गिलने हा झेल आर अश्विनच्या गोलंदाजीवर टिपला आहे. तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना ६५ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला होता. त्यावेळी तिसऱ्याच चेंडूवर आर अश्विनने विकेट मिळवली. हा वेस्टइंडीचच्या पहिल्या डावातील शेवटचा विकेट होता.

गिलचा भन्नाट झेल..

युवा फलंदाज शुभमन गिल देखील उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. अनेकदा त्याने स्लीप आणि शॉट लेगला क्षेत्ररक्षण करत असताना अशक्य वाटत असलेले झेल सहज टिपले आहेत. यावेळी देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे.

अश्विनच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत असलेल्या वारिकनचा चेंडू ग्लोव्हला जाऊन लागला. त्यावेळी शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या शुभमन गिलने डाईव्ह मारत हा झेल टिपला. अंपयारने निर्णय घेण्यापूर्वी अश्विन आणि गिलला विचारलं, मात्र गिलला खात्री नव्हती. (Shubman Gill Catch Video)

त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवण्यात आला होता. रिव्ह्यू पाहून तिसऱ्या अंपायरने त्याला बाद घोषित केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाची दमदार सुरूवात..

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाकडून आर अश्विनने सर्वाधिक ५ गडी बाद केले.

तर भारतीय संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि पदार्पणवीर यशस्वी जयस्वालने संघाला चांगली सुरूवात करून दिली. यशस्वी जयस्वाल ४० तर कर्णधार रोहित शर्मा ३० धावांवर नाबाद आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत ८० धावा जोडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT