shubman gill sister twitter
Sports

Shubman Gill Sister: हे चुकलंच ! RCB चं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंग करणाऱ्या Shubman Gill च्या बहिणीला शिवीगाळ

Shubman Gill Sister Abused: संतप्त चाहत्यांनी शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ केली आहे.

Ankush Dhavre

Shahneel Gill: रविवारी आयपीएल २०२३ स्पर्धेत रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोरदार कामगिरी करत ६ गडी राखुन विजय मिळवला.

या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात शुभमन गिल विजयाचा हिरो ठरला. त्याने तुफानी शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

या विजयानंतर आरसीबीच्या संतप्त चाहत्यांनी शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ केली आहे.

शुभमन गिलची बहीण शहनिल गिल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने २२ एप्रिल २०२३ रोजी शेवटची इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. ती लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी पोहोचली होती.

त्यावेळी तिने गिल सोबतचा फोटो शेअर केला होता. आता शुभमन गिलने जोरदार खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव केल्यानंतर काही काही चाहत्यांनी तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर अपशब्दांचा वापर करायला सुरुवात केली आहे.

शुभमन गिलला भारतीय संघाचा भविष्यातील स्टार असे म्हटले जाते. येणाऱ्या काळात तो संघातील प्रमुख खेळाडू ठरू शकतो. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने २ शतके झळकावली आहेत. ही कामगिरी पाहता स्वतः विराट कोहलीने देखील त्याचे कौतुक केले होते. गेल्या सामन्यात त्याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केलं होती.

तर रविवारी झालेल्या सामन्यात शुभमन गिलची खेळी पाहून विराटने त्याला मिठी मारली होती. मात्र आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या बहिणीला टार्गेट केलं जात आहे. (Latest sports updates)

गुजरातचा विजय..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने १०१ धावांची खेळी केली.

तर फाफ डू प्लेसिसने २८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १९७ धावा केल्या होत्या.

आव्हान तसं मोठं होतं, मात्र गिलने न डगमगता संघाला चांगली सुरुवात करून दिली. या डावात त्याने ५२ चेंडूंचा सामना करत नाबाद १०४ धावांची खेळी केली.

विजय शंकरने त्याला चांगली साथ दिली. त्याने या डावात ५३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावे केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

Maharashtra Politics: पोटात अन्न नाही, डोक्यात हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार, बंड करणाऱ्या आमदारानं सांगितला गुवाहाटीचा भयानक किस्सा|VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT