ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर भात उरतो. अशा वेळी, दुसऱ्या दिवशी शिळा भात खावा लागतो.
शिळा भात खाल्ल्याने कधीकधी खोकला होऊ शकतो. त्याचा शरीरावर थंड परिणाम होतो आणि फ्रीजमध्ये ठेवलेला भात आरोग्यासाठी फायदेशीर मानला जात नाही.
जर तुमच्या घरी शिजवलेला भात उरला असेल, तर तो फेकून देण्याऐवजी, त्याचा वापर करून सोप्या आणि स्वादिष्ट पाककृती तुम्ही बनवू शकता.
तुपात टोमॅटो आणि कांदा परतून घ्या आणि नंतर त्यात भात घालून फ्राइड राइस तयार करा. तुम्ही हे जेवण म्हणून सुध्दा खाऊ शकता.
उरलेल्या भातापासून तुम्ही भाताचे पकोडे बनवू शकता. भात बटाट्यासोबत कुस्करून घ्या आणि त्यात मसाले टाका. पकोडे बनवा आणि ते खाण्याचा आनंद घ्या.
खीरीसाठी भात शिजवायला लागतो पण, रात्री उरलेल्या भातपासून तुम्ही स्वादिष्ट खीर बनवू शकता.
सहसा पराठ्यांमध्ये बटाटा आणि कांद्याचे सारण भरले जाते, पण यावेळी भाताचे सारण वापरून पराठा तयार करा . राइस पराठा हा चविष्ट आणि आरोग्यदायी मानला जातो