shubman gill twitter
Sports

Shubman Gill Century: शुभमनला नमन! मधवालला 'आकाश' दाखवत ठोकलं खणखणीत शतक; या विक्रमांची झाली नोंद

Shubman Gill Records After Century: शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आहे.

Ankush Dhavre

GT VS MI,IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर क्वालिफायर २ चा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शुभमन गिलने हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. त्याने पहिल्या चेंडूपासूनच मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. गिलने या सामन्यात ४९ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने आपलं शतक पुर्ण केलं. (Shubman Gill Century)

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज..

शुभमन गिलने या हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने ३ शतके झळकावली आहे. यासह आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा विराट कोहली आणि जोस बटलरच्या नावे आहे. विराट कोहली आणि जोस बटलर यांनी प्रत्येकी ४-४ शतके झळकावली आहेत. आता शुभमन गिलने ३ शतके झळकावली आहेत. (Latest sports updates)

मुंबईच्या गोलंदाजांचा घेतला समाचार..

शुभमन गिलने पहिल्या चेंडूपासून तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. गेल्या सामन्यात ५ विकेट्स घेणाऱ्या आकाश मधवालच्या एकाच षटकात त्याने २० धावा ठोकल्या. तसेच त्याने पियूष चावलाच्या गोलंदाजीवर देखील तुफान फटकेबाजी केली. ३० धावांवर फलंदाजी करत असताना जीवदान मिळालं होतं. टीम डेव्हिडकडून त्याचा झेल सुटला होता.

या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन (Gujarat Titans Playing XI) :

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन (Mumbai Indians Playing XI) :

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT