Shubman Gill cricinfo
Sports

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर शुभमन गिलने निवृत्तीसंबंधित घोषणा केली.

Yash Shirke

India Vs England : बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाने १-१ अशी बरोबरी केली आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिलने सामना जिंकल्यानंतर भावना व्यक्त केल्या. जेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्त होईन, तेव्हा हा सामना माझ्या क्रिकेट कारकीर्दीतला सर्वात सुखद क्षणांपैकी एक असेल, असे शुभमन गिल म्हणाला.

२५ वर्षीय शुभमन गिलने त्याच्या कसोटी कर्णधारपदाची सुरुवात लीड्स येथे केली. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी शुभमनकडे सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्त्वामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला, पण दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाने कमबॅक केले. एजबॅस्टन कसोटी सामना भारताने ३३६ धावांनी जिंकला.

सामन्यानंतरचा शुभमन गिल आणि इतर खेळाडूंचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला. विजयासंबंधित भावना व्यक्त करताना शुभमन गिल म्हणाला, 'ही अशी गोष्ट आहे, जी मी आयुष्यभर जपून ठेवेन. जेव्हा मी निवृत्त होईल, तेव्हा हा विजय माझ्या कारकीर्दीतील सर्वात गोड आठवणींपैकी एक असेल. मला सामन्यातील शेवटचा झेल घ्यायची संधी मिळाली. आम्ही सामना जिंकू शकलो याबद्दल मी खूप समाधानी आणि आनंदी आहे.'

'आता आणखी तीन सामने बाकी आहे. या सामन्यानंतर जलद बदल होतील. मला वाटते की बदल चांगले आहेत. आता आमच्याकडे लय आहे. सर्व खेळाडूंनी त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या. बॉल आणि बॅटने सर्वांनी ज्या प्रकारे योगदान दिले, ते खूपच सकारात्मक आहे, याच गोष्टी कोणत्याही संघाला चॅम्पियन बनवतात', असे वक्तव्य शुभमन गिलने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

Politics: महायुतीत धुसफूस! भाजपकडून शिंदेंच्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; फोडाफोडीचं राजकारण सुरू

Operation Mahadev : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Shingnapur News : शनी शिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

Death : शटलकॉक घ्यायला गेला अन् खाली कोसळला, बॅडमिंटन खेळताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT