team india saam tv news
क्रीडा

Team India Playing 11: गिलचा पत्ता कट अन् सरफराजची होणार एन्ट्री! दुसऱ्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Team India Playing 11 For 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.

Ankush Dhavre

Team India Playing 11 For 2nd Test:

भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी २ मोठे धक्के बसले आहेत. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि प्रमुख फलंदाज केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर,सरफराज खान आणि सौरभ कुमार यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणारा दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखपट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतात.

गिलचा पत्ता कट?

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रजत पाटीदारला (Rajat Patidar) भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. तो देखील तुफान फॉर्ममध्ये भारतीय अ आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची भारतीय संघात (Team India) निवड करण्यात आली आहे. तो दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates in marathi)

वॉशिंग्टन सुंदर अन् सरफराज खानला मिळणार संधी?

गेल्या काही वर्षांपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) अखेर भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. या सामन्यातून केएल राहुल बाहेर झाला आहे. त्यामुळे केएल राहुलच्या जागी सरफराज खान चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. तर रविंद्र जडेजा देखील दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे संघाला अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. जो गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकेल. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing 11):

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल/रजत पाटीदार, सरफराज खान, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT