टीम इंडियाचा सलामीवर शुबमन गिलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. शुबमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच भारताचा खेळाडू ईशान किशनने शुबमन गिल बरा होत आहे, अशी माहिती दिली आहे. शुबमन गिलच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागल्याने लवकरच संघात परतणार का, यावरून क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)
शुभमन गिलला डेंग्यू झाला होता. शुबमनला डेंग्यू झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. डेंग्यू झाल्यामुळे त्याला ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना खेळता आला नाही.
गिलला डेंग्यू झाल्यामुळे त्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल केले होते. गिलच्या तब्येतीबाबत बीसीसीआयची मेडिकल टीम वेळोवेळी माहिती घेत होती. गिलच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. (Latest Cricket News)
शुबमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याचं ६ ऑक्टोबर रोजी अहवालातून समोर आलं. यामुळे त्याला ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेला सामना खेळायला मिळाला नाही. गिलच्या जागी ईशान किशनला सलामीसाठी उतरवलं होतं.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात ईशान किशन शून्य धावांवर बाद झाला होता. तर बुधवारी झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
दरम्यान, ईशाननेच शुबमन गिलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. ईशान म्हणाला की, 'शुबमन बरा होत असून सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक लवकर बरा होत आहे. यामुळे शुबमन लवकरच भारताकडून खेळताना दिसेल. सध्या तो त्याच्या फिटनेसवर अधिक लक्ष देत आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.