Shubman Gill First Century in Test/BCCI-Twitter SAAM TV
Sports

Shubman Gill : शुभमन गिल तळपला, ७०० दिवसांनंतर कसोटीत ठोकलं पहिलं शतक

India Vs Bangladesh Test : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलनं कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं.

Nandkumar Joshi

Ind vs Ban 1st Test : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलची शतकांची प्रतीक्षा अखेर संपली. चटगाव कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताच्या या युवा सलामीवीरानं शानदार शतकी खेळी केली. गिलने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिलं शतक साजरं केलं. गिलची यापूर्वी ब्रिस्बेन कसोटीत शतक झळकावण्याची संधी हुकली होती. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध दुसऱ्या डावात तो ९१ धावांवर बाद झाला होता. मात्र, यावेळी त्यानं ही कसर भरून काढली. तब्बल ७०० दिवसांनंतर त्यानं हे कसोटीतलं पहिलं शतक ठोकलंय.

बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलनं १४७ चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलं. गिलनं या शतकी खेळीत १० चौकार आणि दोन षटकार मारले. ९५ धावांवर खेळत असताना त्यानं रिव्हर्स स्वीपचा फटका मारला. त्यानंतर ९९ धावांवर असताना त्यानं पुढे येत लॉंग ऑनच्या वरून चौकार लगावला. (Latest Marathi News)

गिल ११० धावा करून बाद

शुभमन गिलनं १५१ चेंडूंत ११० धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर वेगाने धावा करण्याचा त्याचा इरादा होता. मेहदी हसनच्या चेंडूवर त्यानं षटकार लगावला. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्यानं विकेट गमावली. (Team India

शुभमनला नशिबाची साथ

शुभमन गिलनं शतक ठोकलं असलं तरी, तो नशिबवान ठरला. दुसऱ्या डावाच्या ३२ व्या षटकात गिलविरोधात पायचीतची अपील झालं होतं. पंचांनी त्याला नाबाद दिलं. बांगलादेशनं डीआरएसची मागणी केली. पण गिल नशिबवान ठरला. त्यावेळी डीआरएस यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळं ही सुविधा त्यावेळी उपलब्ध नव्हती.

गिलची अप्रतिम फटकेबाजी

शुभमन गिलनं चटगाव कसोटीच्या पहिल्या डावात अत्यंत वाईट फटके खेळून आपली विकेट गमावली होती. दुसऱ्या डावात मात्र त्यानं ही चूक सुधारली. त्यानं फटक्यांची निवड चांगली केली. गिलने आखुड टप्प्याच्या उसळणाऱ्या चेंडूंवर आक्रमक खेळ केला. मैदानात त्यानं चौफेर फटकेबाजी केली. त्यानं आपल्या डावात ४० धावा एकेरी आणि ६ दुहेरी धावा घेतल्या. गिलनं धावांची गती चांगली ठेवली होती.

शुभमन गिलसाठी २०२२ हे वर्ष खूपच कमालीचं राहिलंय. गिलनं यावर्षी १६ डावांत ६०.६९ च्या सरासरीनं ७८९ धावा केल्या. यापूर्वी त्यानं झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यात शतक झळकावलं होतं. तसेच त्यानं चार अर्धशतकेही केली आहेत.

व्हिडिओ बघा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली महाराष्ट्र कन्या कोण? दिव्या देशमुखबद्दल जाणून घ्या!

Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून ड्रॅग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त; ४०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त, कर्नाटक कनेक्शन उघड

Methi Pani: दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यास शरिरात काय बदल होतात?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे घेणार लोकमान्य टिळक यांचे पनतु दिपक टिळक यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Farmer : पत्नी विठ्ठल दर्शनाला पंढरपुरात; शेतात जात पतीने उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT