Shubman gill ICC player of the month saam tv
Sports

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Shubman Gill : इंग्लंडसारखी धारदार गोलंदाजी चोपून काढणारा भारताचा कर्णधार शुभमन गिल आता जगातील एकमेव खेळाडू बनला आहे. त्याचं निमित्तही तसंच आहे. आयसीसीकडून चार वेळा त्यानं खास पुरस्कार मिळवला आहे.

Nandkumar Joshi

  • शुभमन गिलनं पटकावला ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

  • चौथ्यांदा हा पुरस्कार मिळवणारा जगातील एकमेव खेळाडू ठरला

  • इंग्लंडविरुद्ध मालिकेत ७५४ धावा, त्यात एक द्विशतक

  • सुनील गावसकर यांचा विक्रमही मोडला

इंग्लंडसारखा दमदार संघ समोर, फलंदाजीसोबतच धारदार गोलंदाजी ही त्या संघाची खास वैशिष्ट्ये. त्यात भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी, युवा फलंदाज. अनुभवाची तशी कमतरताच. युवा आणि नव्या दमाचा खेळाडू असणाऱ्या शुभमन गिलची इंग्लंड दौऱ्यात खरी कसोटी लागेल असं बोललं जात होतं. पण तो या कसोटीला खरा उतरला. भारताला रोखणारी इंग्लंडची प्रत्येक रणनीती, गोलंदाजांचा खोचक मारा अशी सगळी आव्हाने त्यानं पार केली. या दौऱ्यात सर्वाधिक धावा करणारा कर्णधारही ठरला. याच शुभमन गिलला आयसीसीनं जबरा गिफ्ट दिलंय. आयसीसीचा प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार त्याला देण्यात आलाय. आतापर्यंत चार वेळा त्यानं या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार युवा फलंदाज शुभमन गिल याला आयसीसीच्या खास पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार त्याला देण्यात आलाय. हा पुरस्कार पटकावण्याच्या शर्यतीतील इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर या दोघांनाही मागे टाकत या पुरस्कारावर नाव कोरलंय.

शुभमन गिल यानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत ७५४ धावांचा रतीब घातला. जुलैमध्ये खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांत त्यानं ९४.५० च्या सरासरीने ५६७ धावा केल्या होत्या. त्यात एक द्विशतकही आहे. या शानदार कामगिरीमुळं त्याला आयसीसीनं जबरदस्त गिफ्ट दिलंय. प्लेअर ऑफ द मंथ या पुरस्कारानं त्याला गौरवण्यात आलं. जुलै महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाल्यानं खूप चांगलं वाटतंय. यावेळी हा पुरस्कार खूप खास आहे. कर्णधार म्हणून ही माझी पहिली मालिका होती आणि त्यात हा पुरस्कार मला मिळाला आहे. बर्मिंघममधलं द्विशतक अविस्मरणीय क्षणांपैकी एक असेल. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्यानं ज्युरींना धन्यवाद देऊ इच्छितो, अशी प्रतिक्रिया शुभमन गिलने दिली.

शुभमन गिलला चौथ्यांदा पुरस्कार

शुभमन गिल यानं तब्बल चार वेळा आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळवला आहे. याआधी फेब्रुवारी २०२५, जानेवारी २०२३ आणि सप्टेंबर २०२३ मध्ये त्याला हा पुरस्कार मिळाला होता. चार वेळा आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार जिंकणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

एकाच कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून स्पेशल कामगिरी

शुभमन गिल यानं इंग्लंडच्या विरोधात कसोटी मालिकेत महान फलंदाज सुनील गावसकर यांचा रेकॉर्ड मोडला. गिल हा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. गिल हा पहिल्यांदाच कसोटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. पहिल्याच मालिकेत त्याने विक्रमी कामगिरी केली. गावसकर यांनी १९७८ मध्ये वेस्ट इंडीजच्या विरुद्ध एका मालिकेत ७३२ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार

सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

Independence Day 2025 : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राज्यातील 15 सरपंचांचा सन्मान होणार; कुणाला मिळाला मान?

Thursday Horoscope : या राशीच्या व्यक्तीनी प्रवास करताना राहा सावध, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Dahi Handi : दहीहंडी फोडणार आहात? मग अपघात टाळण्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT